शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
6
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
7
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
8
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
9
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
10
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
11
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
12
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
13
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
14
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
15
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
16
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
17
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
18
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
19
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
20
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

रामराई-जोगेश्वरी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:05 IST

वाळूज महानगर : रामराई ते जोगेश्वरी या तीन किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ...

वाळूज महानगर : रामराई ते जोगेश्वरी या तीन किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जोगेश्वरीतून वाळूज व गंगापूरला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने नागरिक या रस्त्याने ये-जा करीत असतात. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना रांजणगावमार्गे विळखा टाकून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सतीश देवकर, अशपाक बेग आदींनी केली आहे.

रांजणगाव फाट्यावर बेशिस्त वाहतूक

वाळूज महानगर : रांजणगाव फाट्यावर अ‍ॅपेरिक्षा चालकांनी अघोषित थांबा तयार केल्यामुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. या फाट्यावर रस्त्याच्या मधोमध अ‍ॅपेरिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहत असल्याने रांजणगाव, कमळापूर व सीएट कंपनीकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारक, प्रवासी व कामगारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रिक्षात प्रवासी भरण्यावरून चालकांत सतत वाद होऊन वाहतूक व्यवस्था ठप्प पडत असते. अ‍ॅपेरिक्षाबरोबर या फाट्यावर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे थाटल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त अ‍ॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

उद्योगनगरीतून ऊसतोड मजूर बेपत्ता

वाळूज महानगर : उद्योगनगरीत नातेवाइकास भेटण्यासाठी आलेला ऊसतोड मजूर बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर श्रावण चव्हाण (३०, रा. मालखेडा, ता. जामनेर) हा २५ डिसेंबरला वाळूज एमआयडीसीत राहणारे मेहुणे गणेश राठोड यांना भेटण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी ऊसतोडीसाठी नगर जिल्ह्यात चाललो, असे सांगत ज्ञानेश्वर हा घराबाहेर पडला होता. मात्र, अद्याप ज्ञानेश्वर घरी न परतल्याने त्याचे वडील श्रावण चव्हाण यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. या बेपत्ता मजुराचा पोहेकॉ. सतीश जोगस हे शोध घेत आहेत.

धोकादायक डीपीचे स्थलांतर करा

वाळूज महानगर : वाळूजच्या ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या धोकादायक विद्युत डीपीचे इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या डीपीलगतच ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट ऑफिस व तलाठी कार्यालय असल्याने नागरिक, शेतकऱ्यांची कामासाठी मोठी गर्दी होत असते. कामानिमित्त पालकांसोबत आलेली लहान मुले नकळतपणे विद्युत डीपीजवळ जात असल्याने गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत आहे. या धोकादायक डीपीचे इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी केली जात आहे.

उद्योगनगरीत ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली आहे. गत आठवड्यात थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांची जोरदार विक्री झाल्याचे सूरजप्रसाद, जगजीवन दास या विक्रत्यांनी सांगितले. आता थंडीचा जोर ओसरल्याने उबदार कपड्यांची विक्रीही मंदावली आहे. या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याने रबी हंगामातील गव्हाच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

--------------------------------