शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पूजा गावंडे हत्या प्रकरण: पोलिसांच्या दिरंगाईमुळे गेला जीव? मृत महिलेच्या मैत्रिणीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:19 IST

पहिल्या पतीची आत्महत्या, दुसऱ्याने वाद होताच केला महिलेचा खून; दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले

करमाड : पेट्रोल पंपावर काम करून आपल्या दोन मुलांची उपजीविका चालविणाऱ्या महिलेचा दुसऱ्या पतीने पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने गळा चिरून खून केला. ही घटना करमाडच्या गणपती मंदिराजवळील इंडियन पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९) दुपारी साडेबारा वाजता घडली. पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु. करमाड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पूजा गावंडे या गेल्या दीड महिन्यापासून करमाड शिवारातील एका पेट्रोल पंपावर नोकरी करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या गुरुवार सकाळी साडेनऊला पेट्रोल पंपावर कामासाठी आल्या. पंपावर ड्यूटी सुरू असताना दुपारी १२.३० वाजता अचानक त्यांचा पती दुचाकीवरून पंपावर आला. त्या उभ्या असलेल्या पंपाच्या स्टँडजवळ त्याने दुचाकी उभी करून पत्नी पूजाला पकडले. यावेळी पूजा यांनी आरोपीच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्यमने पूजा यांचा गळा पकडून पाठीत मागून चाकूने वार करून तिला जमिनीवर पाडले. यानंतर पूजाचा धारदार चाकूने गळा चिरला. यावेळी घटनास्थळी आवाज ऐकून पेट्रोल पंपाच्या मालकाने सत्यमला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाला. ही सर्व घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

आरोपी सत्यम पत्नी पूजाची हत्या करण्यासाठी सकाळी पेट्रोलपंपावर आला होता. परंतु, पंपावर गर्दी असल्याने तो परत गेला. दुपारी साडेबाराला पंपावर वाहनांची गर्दी नसताना त्याने पूजा ज्या पंपाच्या स्टँडवर ड्यूटी करीत होती, त्या ठिकाणी दुचाकी उभी केली. काही कळण्याच्या आत त्याने पूजाला पकडले. तिने पळण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकू काढून तिच्या पाठीवर वार करून तिला जमिनीवर पाडले. त्यानंतर त्याने तिचा निर्दयपणे गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याने कंबरेला चाकू खोचून दुचाकीवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाला ॲम्बुलन्सद्वारे घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले.

पूजाच्या पहिल्या पतीची आत्महत्या, दुसरा विवाह २०२५ मध्येपूजा हिचा पहिला विवाह चित्तेपिंपळगाव येथील सुदाम परसराम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झाला. काही घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी आत्महत्या केली. त्यानंतर पूजा हिने १५ नोहेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडे याच्यासोबत देवाची आळंदी पुणे येथे आर्य समाज संस्था येथे विवाह केला. पूजाला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु, दीड महिन्यापूर्वी पती सत्यम याच्यासोबत काही वाद झाल्याने ती काही दिवसांपूर्वी करमाडला राहण्यासाठी आली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, भारत निकाळजे, जमादार विजयसिंह जारवाल, प्रशांत नांदवे यांच्यासह फिंगर प्रिंटच्या टीमने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

आरोपीला दोन तासांत अटकआरोपी सत्यम खून करून पसार झाला होता. तो पिंपरीराजा मार्गे कचनेरकडे पळून गेल्याची माहिती मिळताच करमाड ठाण्याचे पोलिस दादासाहेब ढवळे, सोपान डकले यांनी फिल्मीस्टाइलने आरोपीचा पाठलाग करीत त्याला कचनेर शिवारातून अटक केली.

...तर वाचला असता जीव, मैत्रिणीने फोडला घटनास्थळी टाहोघटनेची माहिती मिळताच पूजा हिची मैत्रीण छाया गोरख वांगे हिने पूजाच्या आठवणीने टाहो फोडला. यावेळी त्यांनी सांगितले की, आरोपीने पूजासोबत नोव्हेंबर महिन्यात आळंदीत लग्न केले आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी आपसात बॉण्ड करून घटस्फोट देखील घेतला. पूजाने तीन महिन्यांपूर्वी करमाड ठाण्यात सत्यमच्या विरोधात तक्रार दिली होती. तसेच मंगळवारी (दि. ७) पुन्हा तक्रार देण्यासाठी ती सायंकाळी ५ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाण्यात होती. त्याच वेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर पूजाचा जीव वाचला असता, असा टाहो फोडून आज ती माझ्या वाढदिवसाला येणार होती, असे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Karamaad: Woman murdered by husband; police delay alleged by friend.

Web Summary : A woman was murdered at a petrol pump by her husband in Karamaad. The victim's friend alleges police inaction despite prior complaints, potentially costing her life. The accused has been arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर