शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पदवीधरांसाठी मराठवाड्यात ८१३ केंद्रांवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:42 IST

या निवडणुकीत ६३ साहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक केंद्रे

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी ८१३ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याअनुषंगाने विभागीय प्रशासनाने सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २०६ मतदान केंद्र आहेत. २ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पूर्ण सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत विभागीय प्रशासनाने आदेशित केले आहे. आचारसंहिता सूचना, अनुसरण पद्धत, कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत विभागात सूचना करण्यात आल्या आहेत.

या निवडणुकीत ६३ साहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. दरम्यान पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अमलात आणण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी  आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, असे  जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी  सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकारी यांची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आणि जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्याचे नाव        मतदान केंद्रऔरंगाबाद    २०६जालना     ७४परभणी    ७८हिंगोली    ३९नांदेड    १२३लातूर    ८८उस्मानाबाद    ७४बीड                 १३१एकूण    ८१३

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा