शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

लेबर कॉलनीतील प्रकरणात शिरले राजकारण; भाजपचे शिष्टमंडळ महसूल मंत्र्यांना भेटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 15:37 IST

Labor Colony Encroachment Case: यापूर्वी २०१४, २०१६ आणि २०१९ साली जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावून येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची सूचना केली होती.

औरंगाबाद : लेबर कॉलनी परिसरातील (Labor Colony Encroachment Case) सरकारी निवासस्थानांवर ८ नोव्हेंबर रोजी सकाळपासून पाडापाडीची कारवाई सुरू करण्याच्या जिल्हा प्रशासन, मनपा, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाच्या नोटीसमुळे या प्रकरणात राजकारण शिरले आहे.

सोमवारी भाजप आणि एमआयएमने कारवाईला विरोध करण्याची भूमिका घेतली, तर मंगळवारी भाजपने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; परंतु जिल्हाधिकारी न भेटल्यामुळे भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर व इतर शिष्टमंडळांनी महसूल मंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.

लेबर कॉलनीतील २० एकर जागेतील शासनाने बांधलेल्या ३३८ पैकी ८० क्वार्टर्समध्ये काही नागरिक अनधिकृतपणे राहत आहेत, तर ७५ टक्के घरांमध्ये सध्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक वास्तव्यास आहेत. या सर्व नागरिकांनी प्रशासनाविरोधात संघर्षाची तयारी ठेवली आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कारवाईच्या विरोधात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी २०१४, २०१६ आणि २०१९ साली जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावून येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची सूचना केली होती. दोन वेळा पोलीस बंदोबस्त, जेसीबीसह पथक पाडापाडीच्या कारवाईसाठी दाखल झाले होते; परंतु नागरिकांच्या विरोधासमोर पथकाला कारवाई करता आली नव्हती.

ठाण्यातील कारवाईचा दांडगा अनुभवठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असताना २०१६-१७ साली जिल्हाधिकारी चव्हाण यांनी रस्ता रुंदीकरणात अतिक्रमण हटाव मोहिमेत हजारो अनधिकृत मालमत्तांवर कारवाई केली होती. या कारवाईचे सादरीकरण चव्हाण यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर केले होते. ठाण्यासारख्या शहरात अतिक्रमण हटविण्याचा अनुभव असलेले चव्हाण लेबर कॉलनीचे प्रकरण कसे हाताळतात, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादEnchroachmentअतिक्रमण