शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदासाठी राजकीय लॉबिंग; नियुक्तीला होणार उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 14:45 IST

जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत.

ठळक मुद्दे राजकीय समीकरणातून नियुक्ती होणार असल्याची चर्चासुनील चव्हाण यांचे नाव आघाडीवर मनपा आयुक्तांचेही नाव होते चर्चेत

औरंगाबाद :  तीन दिवसांपासून जिल्हाधिकारीपदासाठी कुणाचेही नाव निश्चित झालेले नाही. राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब होत असल्याचे चित्र आहे. कालपर्यंत या पदासाठी दोन अधिकाऱ्यांची नावे होती, आता तो आकडा पाचहून अधिक झाला आहे.  

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, प्रेरणा देशभ्रतार, जे. श्रीकांत, एम.डी. सिंग यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे यामध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. जिल्हाधिकारी नियुक्तीसाठी पुण्यामध्ये ज्याप्रमाणे राजकीय लॉबिंग सुरू झाली आहे, त्याच पद्धतीने औरंगाबादमध्येही लॉबिंग सुरू झाल्याची माहिती महसूल वर्तुळातून समोर येत आहे. पुण्यातही अजून जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. 

दरम्यान, चव्हाण हे जिल्ह्यातील एका राज्यमंत्र्याचे कधीकाळी ओएसडी होते. त्यामुळे त्यांचे नाव १० ऑगस्टपूर्वीपासून चर्चेत आहे. देशभ्रतार या शिस्तप्रिय अधिकारी असल्यामुळे येथील राजकीय परिस्थितीला परवडणाऱ्या नाहीत, म्हणून त्यांच्या नावाला विरोध होतो आहे. एम.डी. सिंग यांचे नाव शिवसेनेतील एका नेत्याने लावून धरले आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जे. श्रीकांत हे औरंगाबादला येण्यास इच्छुक नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात कमी राजकीय ताकद असली तरीही येथे जिल्हाधिकारी नियुक्ती करताना या दोन पक्षांची मर्जीदेखील महत्त्वाची असणार आहे. 

नियुक्तीला उशीर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थिती प्रशासनातील महत्त्वाच्या बदल्या एप्रिल-मेपासून थोपविण्यात आल्या होत्या; परंतु बदली केल्यानंतर तातडीने नवीन अधिकारी नियुक्त करण्याबाबत आगामी राजकीय समीकरणांचा विचार होत असल्याचे दिसते आहे. यातूनच जिल्हाधिकारी नियुक्तीला उशीर होतो आहे. ही नियुक्ती कधी होते, याकडे राजकीय आणि अधिकारी मंडळींचे लक्ष लागले आहे. 

सुनील चव्हाण यांचे नाव आघाडीवर महावितरणचे औरंगाबाद येथे कार्यरत सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांचे नाव सध्या जिल्हाधिकारी म्हणून आघाडीवर असल्याची माहिती मुंबइतील सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकारीपदाच्या नावाची घोषणा या आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरावे असे या नेत्यांना वाटत आहे. त्यादृष्टीने चव्हाण यांच्या नावावर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे दुमत होण्याचे कारण दिसत नाही. हिंगोलीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचेही नाव   समोर येत आहे. निवृत्तीच्या उंबरठयावर त्यांना नियुक्ती मिळू शकते याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, त्यांचे नाव राजकीय क्षेत्राकडून समोर आले नसल्याची माहिती आहे. 

मनपा आयुक्तांचेही नाव होते चर्चेतबुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी कुणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांत चर्चा झाली. त्यामध्ये मनपा प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांचे नावही पुढे आले; परंतु ते आयुक्तपदी येऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकार