शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राजपूत दाम्पत्याचे मोबाईल कॉल डिटेल्स पोलिसांनी मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 19:21 IST

दोन्ही मुलींना बसला मानसिक धक्का

ठळक मुद्देशैलेंद्र राजपूत खून प्रकरण

औरंगाबाद : उद्योजक शैलेंद्र राजपूत हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी  राजपूत दाम्पंत्याच्या मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती मागविली आहे. शैलेंद्र यांनी शेवटचा कॉल कोणाला केला आणि त्यांचे काय बोलणे झाले, तसेच आरोपी पूजा हिने पतीच्या हत्येनंतर कोणाला कॉल केला, त्या व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उल्कानगरीतील मे-फेअर या उच्चभू्र वसाहतीत राहणारे उद्योजक शैलेंद्र राजपूत यांचा सोमवारी रात्री त्यांची पत्नी पूजा हिने चाकूने भोसकून खून केला. तेव्हापासून पूजा पोलिसांच्या कोठडीत आहे. या खुनाचा तपास करणारे पोलीस पथक गुरुवारी दुपारी घटनास्थळी गेले होते. यावेळी त्यांनी राजपूत दाम्पत्याच्या दोन्ही मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही मुली मानसिक धक्क्यात आहेत. यामुळे पोलिसांना त्यांच्याशी बोलता आले नाही. 

घटनेच्या रात्री शैलेंद्र हे घरी आले तेव्हा ते आर्किटेक्ट मैत्रिणीसोबत बोलत होते. त्या मैत्रिणीवरूनच या दाम्पत्यात भांडण झाले आणि हत्येची घटना घडली. यामुळे शैलेंद्र आणि त्या आर्किटेक्ट व्यक्तीचे काय नाते होते, याबाबतची माहिती पोलीस घेणार आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, घटनेच्या रात्री शैलेंद्र यांचे शेवटचे बोलणे कोणासोबत झाले, तसेच पूजा यांनी पतीच्या हत्येनंतर नंदनवन कॉलनीतील मैत्रिणीला कॉल केला होता, अशी माहिती पोलिसांना समजली. मात्र, मृत आणि पूजा यांचे मोबाईल कॉल डिटेल्स मिळाल्यानंतरच या गुन्ह्याच्या तपासाला काही दिशा मिळते का, हे लवकरच कळणार आहे. 

पूजा शांतपणे ठाण्यात बसूनपोलीस कोठडीतील पूजा राजपूत ही शांतपणे जवाहरनगर पोलीस ठाण्यातील एका खोलीत बसून असते. दोन महिला पोलिसांचा तिच्यावर खडा पहारा असतो. पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बोलत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.दरम्यान तिची बहीण पूजाला भेटण्यासाठी ठाण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात भेट झाली अथवा त्यांच्यात काय बोलणे झाले, याबाबत दुजोरा मिळू शकला नाही. खून केल्याच्या आरोपाखाली अटकेतील पूजा राजपूतच्या बहिणीने आज जवाहरनगर पोलीस ठाण्यात तिची भेट घेतली. यानंतर आग्रहाखातर तिने जेवण केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद