शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेने टळला साखरपुड्यामध्ये होणारा बालविवाह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:11 IST

साजापुरातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा साखरपुड्यात होणारा नियोजित बालविवाह पोलीस पथकाने केलेल्या समुपदेशनामुळे टळला. नातेवाईकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतर  लग्न करण्याची हमी पोलिसांना दिली.

ठळक मुद्देसाजापुरातील ही अल्पवयीन मुलगी शहरातील महाविद्यालयात ११ वीत शिकते.

औरंगाबाद : साजापुरातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा साखरपुड्यात होणारा नियोजित बालविवाह पोलीस पथकाने केलेल्या समुपदेशनामुळे टळला. नातेवाईकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्न करण्याची हमी पोलिसांना दिली.

साजापुरातील ही अल्पवयीन मुलगी शहरातील महाविद्यालयात ११ वीत शिकते. नेवासा तालुक्यातील नात्यातील तरुणाबरोबर तिचा विवाह ठरला होता. १८ एप्रिलला साखरपुड्यातच विवाह उरकण्याची पालकांनी तयारी करून नातेवाईकांना तोंडी निमंत्रणेही दिली होती. या बालविवाहाची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने कुणीतरी महिला तक्रार निवारण केंद्राला माहिती दिली. ग्रामीण महिला तक्रार निवारण केंद्रातील फौजदार मनीषा लटपटे यांनी ही माहिती दामिनी पथकाला दिली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पोहेकॉ. लता जाधव, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या फौजदार आरती जाधव, पोकॉ. संतोष जाधव आदींच्या पथकाने सोमवारी साजापुरातील ते घर गाठून कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली.  

पालकाचा जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे मुलीचे लग्न लवकर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिली. आम्हाला मुलगा नसून पाचही मुलीच आहेत. आई गृहिणी, तर वडील बांधकाम मिस्तरी आहेत. मोठ्या मुलीचे लग्न करून जबाबदारीतून मुक्त व्हावे, यासाठी तिचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुलीसह तिचे आई-वडील व मामाला पोलिसांनी समुपदेशन करण्यासाठी ठाण्यात आणले. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा मुलीने यावेळी व्यक्त केली. समुपदेशनानंतर  मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न सज्ञान झाल्यानंतरच करण्याची लेखी हमी पोलिसांना दिली. तहसीलदारांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती फौजदार जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसWalujवाळूज