शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना औरंगाबाद विमानतळाहून पाठवलं माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 21:47 IST

औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना पोलिसांनी प्रवेश नाकारत चिकलठाणा विमानतळावरून परत पाठविले

औरंगाबाद, दि. 29 - औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना पोलिसांनी प्रवेश नाकारत चिकलठाणा विमानतळावरून परत पाठविले. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी तीन दिवसाच्या दौ-यानिमित्त तस्लीमा नसरीन औरंगाबादमध्ये आल्या होत्या. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी  वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन औरंगाबादेत विमानाने येत असून त्या हॉटेल ताज येथे मुक्कामी थांबणार आहेत,अशी माहिती शहरात पसरताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल ताज आणि चिकलठाणा विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी केली आणि घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. 

आमदार इम्तियाज जलील यांनी पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून तस्लीमा यांना शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रेषितांबद्दल अपशब्द लिहिणा-या या लेखिकेला शहराच्या पवित्र भूमित पाय ठेवता येणार नाही,असा इशारा त्यांनी दिला. यानंतर पोलीस अधिका-यांनी तात्काळ चिकलठाणा विमानळावर धाव घेतली. एअर इंडियाच्या विमानाने रात्री साडेसात वाजता तस्लीमा विमातळावर येताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी तिची भेट घेतली आणि मॅडम तुम्हाला शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले. यावेळी तस्लीमा  यांनी त्यांचा नियोजित दौरा अत्यंत गुप्त असल्याचे पो.नि.परोपकारी यांना सांगितले. तेव्हा परोपकारी यांनी त्यांना तुमचा दौरा गुप्त राहिलेला नाही.तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहात,कोठे जाणार आहात,याबाबतची माहिती संपूर्ण शहरात पसरली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तुम्ही परत जा,अशी विनंती त्यांनी केली. एवढेच नव्हे तर विमानतळ अधिका-यांशी संपर्क साधून तस्लीमा आणि त्यांच्या मुलीला परत घेऊन जाण्याची विनंती केली.