नांदेड : जिल्ह्यात पोलिस दलामध्ये रिक्त असलेल्या ७२ जागांसाठी उद्या ६ जूनपासून भरतीप्रक्रिया सुरू होत आहे़ या जागांसाठी १९८५ अर्ज आले आहेत़़ या भरतीप्रक्रियेसाठी पोलिस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी दिली़जिल्ह्यात पोलिस दलात रिक्त असलेल्या ७२ जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी ६४ जागा आहेत़ त्यात सर्वसाधारण १९, महिला १९, खेळाडू ३, प्रकल्पग्रस्त ३, भूकंपग्रस्त १, माजी सैनिक १०, अंशकालिन ६ आणि गृहरक्षक दलासाठी ३ जागा आहेत़ विमाव प्रवर्गासाठी असलेल्या ६ जागांमध्ये सर्वसाधारण २, महिला २ माजी सैनिक १ आणि अंशकालिनसाठी १ जागा आहे़ तर इमाव प्रवर्गासाठी २ जागा आहे़ त्यात सर्वसाधारण १ आणि महिलेसाठी १ जागा आहे़ या भरतीप्रक्रियेंतर्गत ६, ७ आणि ८ जून रोजी उमेदवारांचे शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व चेस्टर नंबर वाटपची कार्यवाही करण्यात येणार आहे़ तर १०, ११ व १२ जून रोजी मैदानी चाचणी होणार आहे़ १५ जून रोजी लेखी चाचणी होणार आहे़ या प्रक्रियेसाठी निवडक पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी तसेच कार्यालयातील कर्मचार्यांची निवड करण्यात अली आहे़ पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी सर्व प्रक्रियेची व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे़ पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शी व नि:पक्षपाती होणार असून कुणीही आमिष दाखवून पैशांची मागणी करीत असेल तर नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या ०२४६२-२५३५१२ या दुरध्वनी क्रमांकावर तसेच नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकांच्या ०२४६२-२३४५०४ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)भरतीसंदर्भात कार्यशाळापोलिस भरती प्रक्रियेसंदर्भात बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात अधिकार्यांची कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी मार्गदर्शन केले़ पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भातील नियमावलींची विस्तृत माहिती भरतीप्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना यावेळी देण्यात आली़ या कार्यशाळेस अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, श्याम घुगे, सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अमोघ गावकर आदींची उपस्थिती होती़
आजपासून पोलिस भरती
By admin | Updated: June 6, 2014 01:08 IST