शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मटका' जुगाराची सेंटर रूमच उध्वस्त;१४ बुकी पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 19:26 IST

पोलिसांनी मटक्याचे सुत्र हालणाऱ्या सेंटर रूमवरच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पैठण (औरंगाबाद ) : यात्रा मैदानातील 'मटका' अड्ड्याच्या सेंटर रूमवर आज पैठण पोलीसांनी छापा मारला. यावेळी १४  बुकींना पोलिसांनी अटक केली आहे. सेंटरमधून २७ हजार रूपये रोख व मटका बुकिंग घेण्यासाठी लागणारे साहित्य, असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

अलीकडच्या काळात कल्याण मटका जुगाराचे नेटवर्क पैठण शहरात चांगलेच पसरले होते. पोलिसांनी मटक्याचे सुत्र हालणाऱ्या सेंटर रूमवरच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांच्या कारवाई नंतर शहरातील अनेक मटका बुकी भूमिगत झाले आहेत. पैठण शहरातील यात्रामैदाना लगत कल्याण मटका चालविणाऱ्यांनी सेंटर रूम थाटले होते. या रूम मधून मटक्याची सर्व सूत्रे हलविण्यात येत होती.

आज पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक अरविंद गटकूळ, महेश माळी, मनोज वैद्य,  गणेश शर्मा,  गोपाल पाटील, गणेश कुलट यांच्या पथकाने याच रूमवर छापा टाकून कल्याण मटका जुगाराची यंत्रणा उध्वस्त केली. यावेळी तेथे मटका बुकिंग घेणारे १४ बुकी, कल्याण मटका बुकींग सीट, कार्बन बुक, हिशेबाचे कँलक्युलेटर, मोबाईल, मोटारसायकल व रोख २७ हजार रूपये असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक अरविंद गटकूळ यांच्या फिर्यादीवरून पोलीस नाईक गोपाळराव पाटील यांनी १४ बुकी विरोधात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मदने पुढील तपास करीत आहेत.

मटक्याची पाळेमुळे शोधून काढू.....मटका घेणाऱ्या १४ बुकींना पोलीसांनी अटक केली आहे. शहरात चालणाऱ्या मटक्याची पाळेमुळे शोधून त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.  कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही असा ईशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद