शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

'पोलीस,पोस्ट, पासपोर्ट', ट्रिपल 'पी' सूत्राच्या स्वीकाराने औरंगाबादच्या पासपोर्ट कार्यालयाची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 18:48 IST

तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सेवेची प्रतीक्षा, तात्काळ पासपोर्टसाठी गाठावे लागते नाशिक, मुंबई

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : येथील पासपोर्ट सेवा केंद्र टपाल कार्यालयाच्या मदतीने २८ मार्च २०१७ ला सुरू झाले. सेवेमुळे ते महाराष्ट्रात नंबर एक ठरले आहे. परंतु तात्काळ पासपोर्टसाठी नाशिक, मुंबई गाठावे लागते. तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सेवेची स्मार्ट औरंगाबादकरांना प्रतीक्षाच आहे.

कार्यालयाच्या कक्षा विस्तारणार असून, त्यासाठी पासपोर्ट कार्यालय, पोलीस तसेच पोस्ट अशी ‘कोंबो ट्रिपल पी’ जोमाने कामाला लागली आहे. त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्राच्या औरंगाबाद सेंटरची सेवा महाराष्ट्रात सुपर ठरली आहे. मुंबई, नाशिक वाऱ्यांचा दंडात्मक प्रवास आता टळला खरा, परंतु कागदपत्रांची पडताळणी, मुलाखत, पोलिसांकडून पडताळणी त्यानंतर छपाई होऊन १५ ते २० दिवसांत टपाल कार्यालयाच्या जलद सेवेने पासपोर्ट तुमच्या पत्त्यावर येतो. पोलिसांच्या पडताळणीचा रिपोर्ट तात्काळ मिळाला, तर दुसऱ्या दिवशीच तो पाठविला जातो.

पासपोर्ट कार्यालयाने घेतली भरारी...दोन वर्षात देश-विदेशांची विमान सेवा विस्कळीत असली, तरी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत जिल्हाभरात १४ हजार ४६८ जणांनी पासपोर्ट घेतला. १ एप्रिल २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ३४ हजार ९७१ जणांना पासपोर्ट मिळाल्याची नोंद आहे.

विलंब करीत नाही...मुंबई-नाशिकहून एका दिवसात, तर औरंगाबादेतून संदेश दोन दिवसांत येतो. त्यामुळे ऑनलाईनने जलद गतीने पोलीस यंत्रणाही काम करीत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने तात्क़ाळ अर्ज पडताळणी करून ऑनलाईन पासपोर्ट कार्यालयास पाठविला जातो. त्यामुळे आठ ते पंधरा दिवसांत पासपोर्ट हाती पडतो.- कारभारी नलावडे, विशेष शाखा, सातारा पोलीस ठाणे, औरंगाबाद.

अतिजलदसाठी विस्तार; वरिष्ठांकडेच निर्णय...अतिजलदची यंत्रणा औरंगाबाद सेंटरला सुरू करण्याची वरिष्ठांच्याच हाती आहे. मार्च महिन्यात सध्यादेखील दररोज ८० अर्जदारांच्या मुुलाखती तसेच कागदपत्र पडताळणीचे काम सुरू आहे. पोलीस, टपाल यंत्रणेमुळे पासपोर्ट लवकरच मिळतो. पोलीस यंत्रणेच्या रिपोर्टवर तात्काळ दुसऱ्यादिवशी पासपोर्ट छपाई विभागातून तो पासपोर्ट प्रिंट होऊन निघण्याची यंत्रणा गतिमान आहे.- हिमान्शू यादव, अधिकारी, पासपोर्ट सेवा केंद्र, औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट