शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ, पोलिस पाटील ‘नवरोबा’ला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:00 IST

कौटुंबिक न्यायालय : फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ (३) चा भंग

छत्रपती संभाजीनगर : पत्नीला एक वर्षाची पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करणारा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावचा पोलिस पाटील गणेश सीताराम राऊत याला औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश स्मिता पी. सावसकर यांनी ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

गणेश राऊत याने ६ महिन्यांचा कारावास पूर्ण केल्यास अथवा पोटगीची थकीत रक्कम एक लाख ८० हजार रुपये जमा केल्यास (यापैकी जे आधी पूर्ण होईल) त्याची सुटका करावी, असे आदेशात म्हटले आहे. अर्जदार सायली यांनी ‘वसुली अर्जात’ म्हटल्यानुसार गणेश राऊत याने पत्नीला १० हजार रुपये आणि ३ वर्षांच्या बालकाला पोटगी म्हणून दरमहा देण्याचा आदेश न्यायालयाने २० मार्च २०२४ रोजी दिला होता. मात्र, अनेक प्रयत्न करूनही पती पोटगी देत नव्हता. म्हणून पतीविरुद्ध ‘अटक वॉरन्ट’ जारी करण्याची विनंती पत्नीने अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवड येथील पोलिसांनी गणेशला येथील कौटुंबिक न्यायालयात हजर केले होते.

पोटगी देण्यास चक्क नकारएकूण थकीत ७ लाख ३० हजारांपैकी किती रक्कम भरण्यास तयार असल्याचे न्यायालयाने गणेशला विचारले असता त्याने केवळ ५ हजार रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली. त्याच्या अशा वर्तनामुळे न्यायालयाने गणेशने हेतुपुरस्सर पोटगी थकवून न्यायालयाच्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १२५(३) नुसारच्या आदेशाचा भंग केल्याचे निरीक्षण नोंदवीत वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCourtन्यायालय