शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

 डिजिटलायझेशनमुळे पोलीस अधिक उत्तरदायी -मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:19 IST

डिजिटलायझेशनमुळे पोलिसांना आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा द्यावी लागते. मागील तारखेत नोंदी आता करता येत नाहीत. परिणामी पोलीस आता अधिक उत्तरदायी झाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डिजिटलायझेशनमुळे पोलिसांना आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा द्यावी लागते. मागील तारखेत नोंदी आता करता येत नाहीत. परिणामी पोलीस आता अधिक उत्तरदायी झाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ.सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, आ. इम्तियाज जलील, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपीन बिहारी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले की, दीड वर्षापूर्वी या इमारतीचे भूमिपूजन आपल्या हस्ते झाले आणि आपणच या इमारतीचे लोकार्पण करीत आहोत. पोलीस आयुक्तालयाची ही इमारत प्रशस्त आणि फंक्शनल अशी आहे. यामुळे येथे बसणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख सेवा देता येईल. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आधुनिक आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयास लाजवील असे बांधकाम पोलीस गृहनिर्माण मंडळाने केले. मागील ३० वर्षांत जेवढी पोलीस ठाणी, प्रशासकीय इमारती आणि पोलीस निवासस्थानांची कामे झाली, त्यापेक्षा अधिक कामे मागील तीन वर्षांत झाली आहेत. ज्या पोलिसांकडून आपण २४ तास सेवेची अपेक्षा ठेवतो, त्यांना राहण्यासाठी उत्तम घरे आपण दिली आहेत आणि देत आहोत. राज्यातील सर्व ठाणी सीसीटीएनएसशी आणि सेंट्रल सर्व्हरशी जोडली गेली; त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे आणि गुन्ह्यांचे विश्लेषण एका क्लिकवर करणे शक्य झाले.महासंचालक पडसलगीकर म्हणाले की, इमारत बांधकामासाठी प्राप्त झालेल्या एकूण निधीत सव्वाकोटी रुपयांची बचत झाली. उत्तम अशा या इमारतीमुळे येथे काम करणाºया अधिकाºयांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. तर महासंचालक बिपीन बिहारी यांनी पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या कामाचा लेखाजोखा मांडला.प्रास्ताविक पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले. तर सूत्रसंचालन उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी केले.डिजिटल तक्रार नोंदविता येईलडिजिटल तक्रार करण्याची सुविधा आता उपलब्ध केली आहे. पोलिसांच्या वेबसाईटवर, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलवर तक्रार करता येते. त्यामुळे पोलिसांनी आपली तक्रार घेतली नाही, अथवा तक्रारदार ठाण्यात आलेच नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. परिणामी पोलिसांसमोर आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा देण्याचे आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.इमारतीच्या पायथ्याशी लोकार्पण शिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नंतर मुख्यमंत्र्यांनी आणि अन्य मान्यवरांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस