शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पोलीस जखमी : ठाण्यात तरुणांची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 23:33 IST

बीड : जालना रस्त्यावर काही तरुण एका हॉटेलवर दगडफेक करत होते. यावेळी पोकॉ रुपेश शिंदे हे तरुणांची ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करत होते. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यात दगड मारुन धूम ठोकली.

बीड : जालना रस्त्यावर काही तरुण एका हॉटेलवर दगडफेक करत होते. यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोकॉ रुपेश शिंदे हे तरुणांची ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करत होते. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यात पाठीमागून दगड मारुन धूम ठोकली. यात शिंदे जखमी झाले.दुचाकी क्रमांक पोलिसांनी ओळखला असून त्यावरुन दोघांवर शिंदे यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून दगड मारून जखमी केल्याची फिर्याद शिवाजीनगर ठाण्यात नोंदवली आहे.यावेळी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शिवाजीनगर ठाण्यात आणले. तेथे रॅलीतील तरुणांचा मोठा जमाव जमला. यावेळी महापुरुषांचा जयघोष करण्यात आला.जमाव आक्रमक झाल्याने तेथे उपअधीक्षक गणेश गावडे यांनी धाव घेतली. जमाव पांगविण्याचा प्रयत्न करुनही कार्यकर्ते ठाणे सोडायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर कार्यकर्ते पांगले.मोमीनपुरा भागातकाही वेळ तणावबीड : रॅलीतील काही तरुणांनी मोमीनपुरा भागात दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनीही प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. त्यात तिघे जण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा तणाव निवळला. त्यानंतर पोलीस दाखल झाले.गेवराई तालुक्यात शंभर टक्के बंदगेवराइ शहरात १०० टक्के बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध रॅली काढण्यात आली. शास्त्री चौक, माळी गल्ली, मोमीनपुरा, भवानीपेठ, चिंतेश्वर गल्ली, तहसील कार्यालय परिसर मार्गे ही रॅली पुन्हा चौकात दाखल झाली. तलवाडा, मादळमोही, उमापूर, पाडळसिंगी येथेही बंद पाळण्यात आला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.परळीत प्रतिसादशहरात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून शहरभर फिरून बंदचे आवाहन केले. या आवाहनाला विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन देण्यात आले. महापुरुषांच्या जयघोषाने शहर दणाणून गेले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.माजलगावात व्यापारपेठ ठप्पमाजलगाव :येथे विविध पक्ष- संघनांतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दिवसभर व्यवहार ठप्प होते. कार्यकर्त्यांनी संभाजी राजे चौक, शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोंढा भागात रॅली काढून बंदचे आवाहन केले. बंद शांततेत झाला. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.अंबाजोगाई, शिरूरात आज बंदअंबाजोगाई : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी अंबाजोगाई व शिरूर येथे बंदची हाक देण्यात आली आहे. अंबाजोगाई विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली. यात बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिरूरमध्ये तिडकेविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सकळ मराठा समाजाच्या वतीने अ‍ॅड. हरी कोठुळे, संतोष गुजर, शरद चव्हाण, भारत पानसंबळ, दीपक खोले, साईनाथ देशमुख, अशोक मोरे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.