शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:30 IST

चोरीच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देएमआयडीसी वाळूज पोलीसांनी पाच दुचाकी केल्या जप्तत्याचे साथीदार मात्र पसार झाले आहेत 

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : चोरी केलेली दुचाकी विक्रीच्या शोधात असलेल्या एका संशयितास बुधवारी (दि. १९) एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. या भामट्याच्या ताब्यातून चोरीच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याचा साथीदार मात्र फरार आहे.

वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात एक जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. त्यावरून  पोलीस पथकाने कामगार चौकात सापळा रचला होता. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास संशयित व्यक्ती दुचाकीवर जात असताना पोलिसांनी त्यास अडविले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. 

सव्वा लाखाच्या पाच दुचाकी जप्तपोलिसांनी त्याला पकडून ठाण्यात आणून कसून चौकशी केली.   सय्यद सिराज (३०, रा. दौलताबाद) असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एका साथीदाराच्या मदतीने विविध ठिकाणांवरून पाच दुचाकी चोरल्याची कबुली देत या दुचाकी दौलताबादेतील राहत्या घरी लपवून ठेवल्याची माहिती दिली. आरोपीने लपवून ठेवलेल्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

  झटपट श्रीमंतीच्या आमिषाने झाला चोरआरोपी सय्यद सिराज हा मूळचा पंढरपूर येथील रहिवासी असून, तो काही वर्षांपूर्वी दौलताबादला राहण्यासाठी गेला होता. सुरुवातीला सिराज हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. खबऱ्या म्हणून काम करताना पोलीस दलाचे कामकाज कसे चालते याची माहिती झाल्यानंतर झटपट श्रीमंत होण्यासाठी तो दुचाकी चोरीकडे वळला. एका साथीदाराच्या मदतीने सिराज विविध ठिकाणावरून दुचाकी चोरून आणत होता. त्याचा साथीदार पसार असून या दोघांकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकप्रमुख राहुल रोडे, पोेहेकॉ. वसंत शेळके, पोना. फकीरचंद फडे, सुधीर सोनवणे, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र अडियाल, पोकॉ. मनमोहन कोलिमी, राजकुमार सूर्यवंशी, देवीदास इंदोरे, बाळासाहेब आंधळे, प्रदीप कुटे आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली. 

टॅग्स :theftचोरीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीPoliceपोलिसArrestअटक