शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात ‘धूम’ टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:26 IST

खंडाळा, परसोडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची कॅश लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या ‘धूम’ टोळीला पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४ वा. (दि.२७) रोटेगाव पुलाजवळ फिल्मीस्टाईल दुचाकीवर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यापैकी एक आरोपी पसार झाला असून, आरोपींच्या ताब्यातून २ दुचाकी, गावठी बंदूक, जिवंत काडतूस चाकू आदी मुद्देमाल जप्त केला. कारवाई स्थानिक गुन्हेशाखा व वैजापूर पोलिसांनी केली.

ठळक मुद्देगावठी बंदूक, २ दुचाकी, जिवंत काडतुसे जप्त : खंडाळा, परसोडा जि.म. बँकेची रोकड लुटण्याचा होता डाव

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : खंडाळा, परसोडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची कॅश लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या ‘धूम’ टोळीला पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४ वा. (दि.२७) रोटेगाव पुलाजवळ फिल्मीस्टाईल दुचाकीवर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यापैकी एक आरोपी पसार झाला असून, आरोपींच्या ताब्यातून २ दुचाकी, गावठी बंदूक, जिवंत काडतूस चाकू आदी मुद्देमाल जप्त केला. कारवाई स्थानिक गुन्हेशाखा व वैजापूर पोलिसांनी केली.आनंद छगन तानसरे (३१, रा.श्रीरामपूर), नितीन नामदेव जाधव (३८, रा. राहता), अमोल लक्ष्मण पारे (२४, रा. कोपरगाव), गणेश अशोक शिंदे (२४, रा. शिर्डी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत, तर देवीदास जाधव (रा. महालगाव) हा त्यांचा साथीदार पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.बँकेचा पैसा लुटणारी टोळी रोटेगाव येथे पुलाजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.यावरून पोलिसांनी सापळा रचला असता पाच जण दोन दुचाकींवर तेथे पोहोचले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी रसवंतीच्या मागे पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत चौघांच्या मुसक्या आवळल्या.मात्र, त्यांचा एक साथीदार पसार झाला. आरोपींच्या ताब्यातून दोन दुचाकी, एक गावठी बंदूक, एक जिवंत काडतूस, मिरचीपूड व चाकू मोबाईल फोन, खाज सुटणारी पावडर आदी साहित्य जप्त केले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सचिन कापुरे, पोनि. सुभाष भुजंग, वैजापूरचे पोनि. अनिरुद्ध नांदेडकर, पोउनि. प्रतापसिंह बहुरे, सदानंद सिद्ध, संजय घुगे, मोईज बेग, गणेश मुळे, किरण गोरे, शेख नदीम, बाबासाहेब नवले, प्रमोद साळवी, योगेश तरमळे, सागर बोर्डे, जालिंदर तमनर, गणेश पाटील यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.थरारक पाठलागरोटेगावच्या पुलाखाली पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता. दरोडेखोरांची टोळी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी आरोपींना शरण येण्यास सांगितले मात्र, त्यांनी बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तोच पोलिसांच्या पथकाने झडप घालून ४ जण ताब्यात घेतले. यावेळी एक आरोपी पसार झाला. दरम्यान, वैजापुरात दरोडेखोर येणार असल्याची माहिती देणारा कॉल अहमदनगर पोलिसांच्या नियंत्रण कक्षेतून आला होता, अशी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.