शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीच्या गुन्ह्यात महिलेला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:06 IST

कॅनडात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची अडीच लाखांची फसवणूक करणाऱ्या आयशा शेख शकील या महिलेला रविवारी २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

औरंगाबाद : कॅनडात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची अडीच लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींपैकी आयशा शेख शकील (३३, रा. टिळकनगर, ता. सिल्लोड, ह.मु. गणेश कॉलनी, औरंगाबाद) या महिलेला रविवारी (दि.२४) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.ए. पठाण यांनी २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी आरोपी शेख शकील शेख भिकन याला अटक केली होती. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत केली आहे, तर तिसरा आरोपी अमर ऊर्फ जुबेर चाऊस हा अद्यापही फरार आहे.यासंदर्भात मोहंमद अदनान मोहंमद हारुण शेख (२५, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी तक्रार दिली होती की, त्याने एम.एस्सी. मायक्रो बॉयलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. अदनानचा मित्र मोहम्मद अमर ऊर्फ मोहम्मद जुबेर चाऊस याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून, तो कॅनडा येथे नोकरी करतो. मोहम्मद अमर याने त्याचा मित्र आरोपी शेख शकील हा कन्सल्टन्सी चालवीत असून, तो विदेशात नोकरी लावून देतो. मी त्याच्याकडे कमिशन एजंट म्हणून काम करतो, असे अदनानला सांगितले. त्यानंतर मोहम्मद अमर याने अदनानची शेख शकील आणि आयशा शेख या दोघांची भेट घालून दिली. आरोपी दाम्पत्याने कॅनडामध्ये प्रयोगशाळेत (लॅबमध्ये) तंत्रज्ञाची (टेक्निशियनची) नोकरी लावून देतो, त्यासाठी साडेपाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

तडजोड होऊन मोहम्मदने अडीच लाख रुपये दिले. पैसे देऊनही नोकरी न लावल्याने मोहम्मद याने पैसे परत द्या म्हणत तगादा लवाला. त्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी आयशा शेख हिला रविवारी (दि.२४) अटक करून न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींकडून फिर्यादीचे अडीच लाख रुपये हस्तगत करावयाचे असून, आरोपींनी फिर्यादीचे घेतलेले पारपत्र (पासपोर्ट)देखील जप्त करावयाचे आहे. आरोपींनी अजून किती बेरोजगारांची फसवणूक केली याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.--------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी