शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

एक पोलीस, एक गुन्हा; शहर पोलीस दलात नेल्सन योजना लागू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:17 IST

शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले. 

ठळक मुद्देशहरातील प्रत्येक ठाण्यात सरासरी १०० ते १३० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि नाईक यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.  

- बापू सोळुंके  औरंगाबाद : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास दर्जेदार आणि सबळ पुराव्यासह करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यास दोषसिद्धीचे प्रमाण वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले. 

शहरातील प्रत्येक ठाण्यात सरासरी १०० ते १३० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि नाईक यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.   शहरातील क्रांतीचौक, सिटीचौक आणि एमआयडीसी वाळूजसारख्या मोठ्या ठाण्यात रोज सरासरी पाच ते सहा गुन्हे दाखल होतात, तर पुंडलिकनगरसारख्या नव्या ठाण्यात रोज एका गुन्ह्याची नोंद होते. ज्यांना गुन्ह्याचा तपास करण्याचा अनुभव आहे, अशाच कर्मचाऱ्यांकडे तपास सोपविण्यात येतो. प्रत्येक ठाण्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्के आहे. 

परिणामी, अशा तपासी अंमलदारांकडे आठ ते दहा गुन्हे तपासासाठी असतात. यामुळे प्रत्येक गुन्ह्याचा तपास करताना बऱ्याचदा तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळी न जाता ठाण्यात बसूनच पंचनामा करावा लागतो. तपास वेळेत करून आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल होत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नेल्सन योजना औरंगाबाद परिक्षेत्रात राबविली. 

दीड महिन्यापूर्वी येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी पहिल्या गुन्हे आढावा बैठकीत शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी नेल्सन योजनेनुसार एक गुन्हा एक पोलीस असे काम करण्याचे निर्देश दिले. एका पोलिसाकडे एका महिन्यात एकच गुन्हा असल्यास त्यांना तपास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि तपास योग्य पद्धतीने होऊन वेळेत दोषारोपपत्रही सादर करणे शक्य होईल. सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र न्यायालयात गेल्यास आरोपीला शिक्षा लागू शकते. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध ठाण्यांतील पोलीस नाईक ते सहायक उपनिरीक्षक पदावरील २०० कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले.

काय आहे नेल्सन योजना?ठाण्यात कार्यरत तपासी अंमलदारांपैकी प्रत्येकी एका अंमलदाराला दर एक महिन्याला गंभीर स्वरूपाचा गुन्हा तपासाला देणे. एकच गुन्हा तपासासाठी असल्याने तो गुन्ह्याच्या घटनास्थळी वेळीच भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करेल, घटनास्थळावर आढळलेले पुरावे जमा करील, गुन्ह्याच्या तपासात वेळीच आरोपीला अटक करील. गुन्ह्यात आरोपींकडून काही जप्ती असेल तर ती करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवील. साक्षीदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे जाबजबाब नोंदवील आणि सबळ पुराव्यांसह वेळीच न्यायालयात दोषारोपपत्र सादर करील.

शहरात सरासरी पाच हजार गुन्ह्यांची नोंदखून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, लुटमार, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, वाटमारी, अपहरण, खंडणी मागणे, मारामारी, विनयभंग, बंदूक बाळगणे, वाहनचोऱ्या, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे, सदोष मनुष्यवध, लाच घेणे, फसवणूक करणे, अनैतिक देह व्यापार ,जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, आदी गंभीर गुन्ह्यांची शहरातील संख्या सरासरी दोन हजार आहे. शिवाय अपघाताच्या गुन्ह्यांची संख्या दीड हजार, तर अन्य किरकोळ गुन्ह्यांची संख्या दोन हजार आहे. 

२०० पोलिसांना नाशिक येथे प्रशिक्षणपोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध ठाण्यांतील दोनशे पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे नाशिक येथे दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय आणखी तपास अधिकारी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाचे हे सत्र यापुढेही सुरूच राहणार आहे. - डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद