शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:00 IST

पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते.

औरंगाबाद: बंजारा कॉलनी, बहादुरपुरा येथील रहिवासी पोलीस नाईक कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

उमाकांत पद्माकर पाटील (५२)असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.  क्रांतीचौक  पोलिसांनी सांगितले की, उमाकांत पाटील हे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते. उमाकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणाची केस कोर्टात प्रलंबित आहे. त्यांच्या या केसची सोमवारी सुनावणी होती. यामुळे  गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. रविवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केले. यांनतर ते झोपले.

दरम्यान पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास त्यांनी जिन्याखालील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. यांनतर शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली आणि घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी उमकांत यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

उमाकांत यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा आहे. त्यांचा मुलगा दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी करतो. मुलगा नोकरीला लागल्यापासून उमाकांत आणि त्यांची पत्नीच घरी राहात होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत.   

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद