शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस हवालदार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 12:23 IST

छावणी नाक्याजवळील घटना

औरंगाबाद : गावाहून घरी परतणाऱ्या मुलाला रेल्वेस्थानक येथे घ्यायला निघालेल्या पोलीस हवालदाराच्या चारचाकीला भरधाव मालवाहू ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात हवालदाराचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या पाचच्या सुमारास छावणी परिसरातील टोल नाक्याजवळ घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवचंद माधवराव कुऱ्हाडे (वय 50, रा. पाडेगाव, औरंगाबाद) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कुऱ्हाडे हे छावणी ठाण्यात कार्यरत होते. या अपघाताप्रकरणी छावणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुऱ्हाडे हे छावणी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा बाहेर गावाहून आज पहाटेच्या रेल्वेने औरंगाबादला येणार असल्याने कुऱ्हाडे हे एका नातेवाईकासोबत पहाटे पाच वाजेच्या दरम्यान ( एम एच 20 इ जे 7065) या चारचाकीने कारने  पडेगाव येथून रेल्वेस्थानकाकडे निघाले. छावणी परिसरातील टोल नाक्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या (एच आर 30 एस 6982) या मालवाहू ट्रकने कुऱ्हाडे यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात कुऱ्हाडेसह त्यांचे नातेवाईक गंभीररीत्या जखमी झाले.

त्यांना तातडीने पोलिसांनी घाटी रुग्णालायत दाखल केले. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. हवालदार कुऱ्हाडे यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर त्यांच्या नातेवाईकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली असून या प्रकरणी  छावणी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास छावणी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातcarकार