शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

परीक्षा संचालकांची उपकुलसचिवांविरोधात संचिका चोरल्याची पोलिसांतील तक्रार ३ दिवसांनी माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:46 IST

गैरसमजातून प्रकार घडल्याची कबुली; महिला उपकुलसचिवांच्या झालेल्या बदनामीची जबाबदारी कोणाची?

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या संचालकांनी २४ जून रोजी एका महिला उपकुलसचिवाने परीक्षा विभागातील संचिका चोरून नेल्याचा आरोप केला होता. बेगमपुरा पोलिस ठाण्यात २७ जून रोजी तक्रार नोंदवली. त्यानंतर ३ दिवसांनी संबंधित संचिका कार्यालयातच असल्याचे सांगत घडलेला प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे ३० जून रोजी बेगमपुरा पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. या प्रकरणातील ही कागदपत्रे माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहेत.

विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी उपकुलसचिव हेमलता ठाकरेंवर आरोप केला होता. ठाकरेंनी २४ जून रोजी वरिष्ठांची परवानगी न घेताच गोपनीय संचिका गाडीतून घरी नेल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यात बीए युनिट, एमए युनिटसह परीक्षेच्या संदर्भातील गोपनीय संचिका आणि गोल शिक्का, संचालकांचा शिक्का नेल्याचेही तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात चोरीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणीही त्यांनी केली. या तक्रारीच्या चौकशीत उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी पोलिस ठाण्यासह परीक्षा संचालकांना खुलासा करीत कोणत्याही प्रकारच्या संचिका माझ्याकडे नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर पोलिसांनी पुन्हा परीक्षा संचालक डॉ. डोळे यांना चाैकशीसाठी बोलावले. तेव्हा डॉ. डोळे यांनी संबंधित संचिकांविषयी कार्यालयात चाैकशी केल्यानंतर त्या मिळाल्याचे नमूद करीत, उपकुलसचिव ठाकरे यांनी व्हिडीओमध्ये फाइलींचे गठ्ठे बांधून घेऊन जात असल्याचे दिसल्याने गैरसमजातून तक्रार नोंदविल्याचे जबाबात म्हटले आहे. याविषयीचा पत्रव्यवहार नुकताच माहितीच्या अधिकारातून उघडकीस आला आहे.

झालेल्या बदनामीची जबाबदारी कोणाची?विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने कोणतीही शहानिशा न करताच थेट उपकुलसचिवांवर संचिका चोरून नेल्याचा आरोप केला. तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर स्वत:च जबाब नोंदवीत संचिका कार्यालयातच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात महिला उपकुलसचिवांच्या झालेल्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद