शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांपासूनच्या बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचे  पोलीस आयुक्तांनी बजावले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:07 IST

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाणे व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गत दोन दशकांपासून लाखो ...

ठळक मुद्देपोलीस  आयुक्तालयाच्या हद्दीत येणा-या वाळूज, एमआयडीसी वाळूज व शहरातील पोलीस  ठाण्यात लाखो रुपये किमतीची हजारो बेवारस वाहने भंगारात धूळखात पडून आहेत. या भंगार बेवारस वाहनांविषयी लोकमतने २७ नोव्हेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पोलीस  आयुक्त यशस्वी यादव यांनी त्याच दिवशी पोलीस उपायुक्तांना भंगार वाहनाचे लिलाव करण्याचे आदेश बजावले

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाणे व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गत दोन दशकांपासून लाखो रुपये किमतीची शेकडो बेवारस वाहने धूळखात पडून असल्याचे वृत्त नुकतेच लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी या बेवारस वाहनांचे लिलाव करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त व संबंधित ठाणेप्रमुखांना बजावले आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया पोलीस  विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.

पोलीस  आयुक्तालयाच्या हद्दीत येणा-या वाळूज, एमआयडीसी वाळूज व शहरातील पोलीस  ठाण्यात लाखो रुपये किमतीची हजारो बेवारस वाहने भंगारात धूळखात पडून आहेत. विविध गुन्हे, चोरी व अपघातग्रस्त दुचाकी व चारचाकी आदी वाहने पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून पडलेल्या आहेत. विशेष म्हणजे या वाहनांना ठेवण्यासाठी बहुतांश पोलीस ठाण्यात जागाच नाही. स्थानिक ठाणेप्रमुखांनी ही वाहने मिळले त्या ठिकाणी उभ्या करुन ठेवली आहेत.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी पडलेली हजारो वाहने ऊन व पावसात धूळखात पडलेली आहेत. या भंगार बेवारस वाहनांविषयी लोकमतने २७ नोव्हेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलीस  आयुक्त यशस्वी यादव यांनी त्याच दिवशी पोलीस उपायुक्तांना भंगार वाहनाचे लिलाव करण्याचे आदेश बजावले होते. पोलीस  आयुक्त यशस्वी यादव यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी जवाहरनगर ठाण्यातील भंगार वाहनांचा लिलाव करण्याची प्रकिया सुरु केली. टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठाण्यातील भंगार वाहनांचा लिलाव होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाहनमालकांनी संपर्क साधावाएमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गत अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने पडून आहेत. चोरी झालेली तसेच अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात असून मूळ मालकांनी वाहनाची कागदपत्रे सादर केल्यास त्यांना वाहनांचा ताबा देण्यात येईल. इतर बेवारस वाहनांसंर्दभात आरटीओ व वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी पत्र व्यवहार करण्यात आला असून लवकरच या वाहनाचा लिलाव करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.