शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वाईन शॉपवर बनावट नोटा चलनात आणणारा पकडला, तपासानंतर पोलिसांनी टोळीच केली उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 16:35 IST

उच्च शिक्षित तरुणाने किरायाने रूम घेत सुरु केला बनावट नोटा छापण्याचा कारखाना

औरंगाबाद : बनावट नोटा चलनात आणण्यासाठी वाईन शॉपवर आलेल्या एकाच्या पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ५००, १०० आणि ५० रुपयांच्या तब्बल १ लाख २० हजाराचे बनावट चलन जप्त करण्यात आले आहे. 

शहरात बनावट नोटा चलनात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना सोमवारी खबऱ्या मार्फत मिळाली होती. यावरून मंगळवारी सायंकाळी पुंडलिकनगर रोडवरील एका वाईन शॉपवर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी रघुनाथ ढवळपुरे यास पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत समरान उर्फ लक्की रशीद शेख ( ३०, जसवंत नगर ) हा बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. लक्की उच्च शिक्षित असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. नितीन चौधरी ( २५, मुकुंदवाडी ) याच्या मदतीने मुकुंदवाडी येथे रूम किरायाने घेऊन लक्कीने  बनावट नोटा छापने सुरु केले होते.  अक्षय आण्णासाहेब पडूळ ( २८, गजाजन नगर ) व दादाराव पोपटराव गावंडे ( ४२ , गजानन नगर ) यांच्या मार्फत बनावट नोटा बाजारात चलनात येत असत. 

दरम्यान, पोलिसांनी मुकुंदवाडी येथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकला. येथून ऑलइनवन प्रिंटर , कटर, कागद, कार जप्त केले. पोलिसांनी लक्कीसह इतर तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे १ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त दीपक गीऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढूमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण दिलीप गांगुर्डे, सपोनी शेषराव खटाने, सफौ रमेश सांगळे, बाळाराम तौर, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, दीपक जाधव, राजेश यदमळ, कल्याण निकम, प्रवीण मुळे, कोमल तारे, प्रशांत भगरे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद