शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या नावाच्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाल्याचा मनस्वी आनंद : कुलगुरू येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:06 IST

कुलगुरू ‘स्थानिक की बाहेरील’ यात निवड रखडली होती.

ठळक मुद्दे पाच उमेदवारांच्या मुलाखतीनंतर १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवडनिवडीपर्यंत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखतीनंतर १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती केली. आज (दि. १६) सकाळी १०.३० वाजता त्यांनी प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडून कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून २०१९ रोजी पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. याच दरम्यान कुलगुरू निवडीसाठी कुलपती तथा राज्यपालांनी शोध समिती स्थापन केली होती. सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनिल दवे, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्लीचे संचालक प्रवीणकुमार आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या समितीने कुलगुरूपदासाठी नामांकन दाखल केलेल्या १२६ पैकी १८ जणांना ३० जून रोजी मुलाखतीसाठी बोलावले.  यातील ५ नावांची शिफारस राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे समितीने केली. 

डॉ. येवले यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक डॉ. के.व्ही. काळे, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. धनंजय माने, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विजय फुलारी आणि नांदेड येथील गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रघुनाथ होळंबे यांचा  यात समावेश होता. या उमेदवारांच्या मुलाखती राज्यपालांनी ५ जुलै रोजी घेतल्या होत्या. यानंतर ‘स्थानिक की बाहेरील’ यात निवड रखडली होती. डॉ. काळे आणि डॉ. माने यांनीही राजकीय पाठिंबा मिळवला होता. 

डॉ. येवले यांनी औषधीनिर्माणशात्र विषयात पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. जून २०१५ साली त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

महामानवाच्या नावाच्या विद्यापीठात काम करण्याची संधीमहामानवाचे नाव असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी कुलपतींनी दिली, याचा मनस्वी आनंद आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही भाग सारखेच आहेत. मराठवाड्यातील युवकांना रोजगारक्षम करण्यावर अधिक भर दिला जाईल. विद्यापीठ निव्वळ पदवी वाटणारे नव्हे, तर रोजगार देणारे केंद्र करण्याचा प्रयत्न असेल.- डॉ. प्रमोद येवले, नवनियुक्त कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद