औरंगाबाद : महापालिका हद्दीच्या विकास आराखड्यातील विद्यमान जागा वापराचे (ईएलयू) काम संपले आहे. तो नकाशा लवकरच मनपाला सादर होणार आहे. इंटरनेटवरून गुगल मॅपच्या आधारे शहरातील विद्यमान जागा वापराचा नकाशा अंतिम करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तो नकाशा फक्त ‘इंडिकेट’ करणारा असल्याचे मतही सूत्रांनी व्यक्त केले.१९७५, १९९१ आणि २००२ साली विकास आराखड्याचे काम झाले़ आगामी २० वर्षांसाठी नूतन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे़ ग्रीन झोन ‘यलो’ करण्याचा सपाटा काही अधिकारी, राजकारण्यांनी लावल्यामुळे आराखड्याचे काम दोन वर्षांपासून लटकले आहे. एजंटाप्रमाणे काही जणांनी कोट्यवधींची ‘सुपारी’ घेऊन नकाशाचे पुडगे स्वत:कडे दाबून ठेवल्याच्या आरोपांनी पालिका वर्तुळात जोर धरला आहे. दोनवर्षांत विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे ७ कर्मचारी या आराखड्यावर काम करीत आहेत. दीड कोटी रुपये आराखड्याच्या कामासाठी खर्च अपेक्षित आहे़
गुगलवरून बनविला गेला शहर विकासाचा आराखडा
By admin | Updated: September 12, 2014 00:30 IST