शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

पर्यटन केंद्रस्थानी ठेवून छत्रपती संभाजीनगराचा विकास आराखडा बनावा

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 7, 2024 19:55 IST

जबाबदारी एकमेकांवर न ढकलता शासन व शहरवासीयांनी मिळून प्रयत्न करावे, अशी सूचना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राज्याध्यक्ष संदीप प्रभू यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा-वेरूळ या जागतिक वारसाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते. पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेला वैभवशाली ऐतिहासिक वारसा येथे आहे. तो टिकविण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

हे शहर राज्याची पर्यटन राजधानी म्हणून पुढे येण्यासाठी ‘पर्यटन’ केंद्रस्थानी ठेवून डेव्हलपमेंट प्लॅन (विकास आराखडा) तयार करणे आवश्यक आहे . ३० वर्षे झाले येथील डीपी प्लॅन तयार झाला नाही. यामुळे शहराचा कासवगतीने विकास होत आहे. राजस्थानप्रमाणे येथेही पर्यटन संस्कृती रुजण्यासाठी लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. जबाबदारी एकमेकांवर न ढकलता शासन व शहरवासीयांनी मिळून प्रयत्न करावे, अशी सूचना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राज्याध्यक्ष संदीप प्रभू यांनी केली. संघटनेच्या ‘क्रीडा महोत्सव’निमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरासह विविध विषयांवर ‘लोकमत’शी चर्चा केली.

प्रश्न : पर्यटन वाढीसाठी काय करावे?उत्तर : आपण विदेशात जेव्हा जातो तेव्हा तेथे मागील काही वर्षांत बांधलेले मोठी प्राणीसंग्रहालये, खास प्रदर्शन सेंटर याद्वारे ते पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरात प्राचीन वारसा आहे. तोच टिकवून ठेवणे व त्याचे मार्केटिंग करण्याची गरज आहे. यासाठी डीपी प्लॅनमध्ये पर्यटनाच्यादृष्टीने पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक असो वा चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून पर्यटक, प्रवासी हॉटेलात आला की, त्यास प्रथमदर्शनी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे दिसली पाहिजेत, अशा प्रतिकृती तयार कराव्यात. त्या पर्यटनाचे क्यूआर कोड लावावेत. ते स्कॅन करून पर्यटकाला तेथील सर्व माहिती उपलब्ध होईल. ‘फर्स्ट इम्प्रेशन ईज लास्ट इम्प्रेशन’ यास म्हणतात. तेथून तो पर्यटक शहराच्या प्रेमात पडेल व सर्व ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी मुक्काम वाढवेल.

प्रश्न : पर्यटनाची राजधानी, भविष्यातील स्मार्ट सिटी ताळमेळ कसा बसेल?उत्तर : स्मार्ट सिटी म्हणजे गगनचुंबी इमारती असा अर्थ नाही. मुंबईत गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या; पण त्यामुळे जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नाही. पर्यटनाची राजधानी व स्मार्ट सिटीचा ताळमेळ बसविण्यासाठी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांच्या वास्तुशैलीची झलक तुम्हाला स्मार्ट सिटीमध्येसुद्धा दिसली पाहिजे. बिबीका मकबरा परिसरात रहिवासी वस्तीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली उंच इमारती उभारल्या व त्यास बाहेरून काचेचे तावदाने लावणे, हे शोभा देणार नाही. येथील ऐतिहासिक वारसाची जाणीव पर्यटकांना पदोपदी दिसली पाहिजे.

प्रश्न : जिल्ह्याचे अर्थचक्र पर्यटनाभोवती का फिरत नाही?उत्तर : गोवा राज्याचे अर्थचक्र फक्त पर्यटनाभोवती फिरते. येथे समुद्र सोडला तर जायकवाडी धरण, गोदावरी नदीपासून ते अजिंठा-वेरूळ, देवगिरी किल्ला, बिबीका मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ गार्डन, नैसर्गिक, धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. या जिल्ह्याची अर्थव्यवस्था पर्यटनाभोवती का फिरत नाही. कारण, त्यादृष्टीने गंभीर विचारमंथन झालेच नाही. त्या विचारमंथनातून पर्यटन संस्कृती निर्माण झाली नाही. कागदावरील ‘अतिथी देवो भव:’ हे शहरवासीयांच्या मनामनांत रुजले तर देशी-विदेशी पर्यटक या शहराकडे आकर्षित होतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटनBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा