शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

औरंगाबादची कन्या करणार ‘इंडिगो’च्या विमानाचे सारथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:19 IST

उद्यापासून इंडिगोचे मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी विमान

ठळक मुद्देपायलट कीर्ती राऊत यांची गगनभरारी६ हजार तासांचा अनुभव

औरंगाबाद : औरंगाबादहून ‘इंडिगो’कडून ५ फेब्रुवारीपासून मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली जात आहे. विशेष म्हणजे ‘इंडिगो’च्या मुंबई-औरंगाबाद-मुंबई या विमानाचे सारथ्य मराठवाड्यातील पहिल्या महिला वैमानिक कमांडर कीर्ती राऊत करणार आहेत.

कीर्ती राऊत या औरंगाबादेतील सदाशिव राऊत आणि जिजाबाई राऊत यांच्या कन्या आहेत. लहानपणी ‘मला विमान उडवायचे’ असे म्हणणाऱ्या कीर्ती पुढे चालून खरोखरच वैमानिक झाल्या.  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दाखल झाल्या आणि स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली. कीर्ती राऊत यांचे वैमानिकाचे प्रशिक्षण डेहराडून, अहमदाबाद आणि फ्रान्स येथे झालेले आहे. त्या २००६ मध्ये किंगफिशर एअरलाईनमध्ये को-पायलट म्हणून रुजू झाल्या. वयाच्या अवघ्या २२ वर्षी वैमानिक होण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले होते. त्यानंतर एप्रिल २०१२ मध्ये त्या इंडिगो एअरलाईनमध्ये रुजू झाल्या. तेथे कमांडरची अंतर्गत परीक्षा पास झाल्या. सध्या त्या कमांडर म्हणून काम करीत आहेत. 

इंडिगोकडून एखाद्या शहरासाठी पहिल्यांदाच नवीन विमान सुरू केले जात असेल, तर त्या विमानाचे सारथ्य करण्याची संबंधित शहरातील पायलटला संधी दिली जाते. औरंगाबादहून बुधवारपासून इंडिगोची मुंबई, दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरूहोत आहे. या तिन्ही मार्गांवर १८० आसनी एअरबसद्वारे ही सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबई-औरंगाबाद-मुंबई या विमानाचे सारथ्य करण्याची संधी कीर्ती राऊत यांना मिळाली आहे. ही बाब मराठवाड्यासाठी मानाचा तुरा रोवणारी ठरणार आहे. 

६ हजार तासांचा अनुभवकीर्ती राऊत यांना तब्बल ६ हजार तास विमान चालविण्याचा अनुभव आहे. अनेक दिवसांपासून मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवेची प्रतीक्षा केली जात होती. ही प्रतीक्षाही आता संपणार आहे. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर तब्बल १० महिन्यांनंतर मुंबईसाठी सकाळच्या वेळेत इंडिगोच्या माध्यमातून नियमित विमानसेवा सुरू होत आहे. 

मोठी संधी मिळालीइंडिगोकडून पहिल्यांदाच औरंगाबादहून विमानसेवा सुरूकेली जात आहे. मुंबई-औरंगाबाद-मुंबई या पहिल्या विमानाचे सारथ्य करण्याची मी विनंती केली. औरंगाबादची कन्या असल्याने संधी दिली पाहिजे, म्हणून वरिष्ठांनी तात्काळ मंजुरी दिली. ही संधी मोठी वाटते.- कीर्ती राऊत, कमांडर, इंडिगो एअरलाईन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpilotवैमानिकtourismपर्यटन