शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेचा निधी कोटीच्या घरात

By admin | Updated: November 28, 2014 01:08 IST

नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेसाठी नियोजित ७५ लाख निधीशिवाय अणखी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी

नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेसाठी नियोजित ७५ लाख निधीशिवाय अणखी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.तसेच वेगवेगळ््या विभागानेही यात्रेसाठी निधी वाढवून देण्याची विनंती केल्याने यंदा यात्रेचे नियोजन एक कोटीपर्यंत जाण्याची स्थिती आहे.माळेगाव यात्रेच्या पुर्वतयारीसाठी गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरोग्य, पाणी यासह विविध विभागांचा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांची उपस्थिती होती. यावर्षी डिसेंबर महिन्यात माळेगाव यात्रेस प्रारंभ होणार असून खबरदारी व नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी विभागनिहाय ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतुद जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने सदर बैठकीत विशेष सूचना दिल्या. या यात्रेत महसूल आणि पोलिस प्रशासनाचा सहभाग महत्वाचा असून सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण कक्ष पाच दिवस कार्यान्वित ठेवण्याची पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, यात्रेदरम्यान तत्काळ सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध ठेवून वैद्यकीय पथक सज्ज ठेवावे. महवितरणचे पथक स्वतंत्र कार्यान्वित असावे, जि.प.च्या वतीने अग्निशामक व्यवस्था करावी. पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही, यासाठी स्वतंत्र पाणीव्यवस्थेसाठी यंत्रणा ठेवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा तसेच वाहनासाठी स्वतंत्र पार्कीगंची व्यवस्था करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिल्या. (प्रतिनिधी)४अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यानी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केली असून यासाठी ६ पोलिस निरिक्षक, ४० पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी असे एकूण ८०० मनुष्यबळ सज्ज असल्याचे सांगितले. माळेगाव यात्रेसाठी नियोजित निधीपेक्षा १० लाख रुपयांचा जादा निधी द्यावा, अशी मागणी यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी केली.