शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांची पीएच.डी नोंदणी धोक्यात? मुदत संपल्यामुळे नोंदणी रद्द होणार 

By राम शिनगारे | Updated: May 2, 2024 17:07 IST

या प्रकरणी विद्यापीठाच्या निर्णयाकडे हजारो संशोधकांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग संलग्न महाविद्यालयांमध्ये पीएच.डीचे संशोधन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची नोंदणी धोक्यात आली आहे. पीएच.डी अधिनियमानुसार संशोधकांना संशोधनासाठी सहा वर्षांची दिलेली मुदत संपली असून, त्या कालावधीत संशोधन पूर्ण केले नाही, त्यांची नोंदणी आपोआप रद्द झाली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी मुदत संपल्यानंतर पुनर्नोंदणी किंवा वाढीव वेळेसाठी विद्यापीठाच्या संंबंधित प्राधिकरणांकडेही धाव घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाने १५ डिसेंबर २०२० रोजी एम.फील, पीएच.डीच्या संदर्भातील सर्व नियमावलीचा १००९ हा अधिनियम मंजूर केला आहे. या अधिनियमानुसार पूर्णवेळ पीएच.डीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी ३ वर्ष आणि जास्तीत जास्त ६ वर्षांमध्ये संशोधन पूर्ण करण्याचा नियम आहे. या अधिनियमाच्या पूर्वी विद्यापीठात ३ ऑक्टोबर २०१६ रोजीचा पीएच.डी अधिनियम लागू होता. त्यातही सहा वर्षांचीच जास्तीत जास्त मुदत दिलेली होती. मात्र, त्या अधिनियमात सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा हवा असेल तर संशोधन मान्यता समितीला (आरआरसी) मान्यता देण्यात आलेली होती. मात्र, २०२०च्या अधिनियमात अशी मुदतवाढ देण्याचा नियमच केलेला नसल्याचे दिसून आले आहे. तसेच हे दोन्ही अधिनियम लागू होण्यापूर्वीपासून विद्यापीठाकडे शेकडो विद्यार्थी अद्यापही पीएच.डीचे संशोधन करीत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काय होणार, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२०१४ पूर्वीची नोंदणी कालबाह्य का?विद्यापीठातील पीएच.डी विभागाकडे २०२४ पूर्वी नोंदणी केलेले काही संशोधन प्रबंध जमा झाले आहेत. काहींच्या संशोधन प्रबंधांचे बहि:स्थ अहवाल प्राप्त झाले असून, काहींचा अंतिम गोषवारा सादर केला आहे. या विद्यार्थ्यांची मुदत संपलेली असल्यामुळे त्यावर संबंधित विभाग काहीच निर्णय घेत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे २०१४ पूर्वी पीएच.डी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, बोर्ड ऑफ डीन, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेऊन संशोधक विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

संशोधनासाठी कालावधी निश्चित २०१४ पूर्वी नोंदणी केलेली आणि त्यांनी पुनर्नोंदणी केलेली नाही, अशी काही प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. विद्यापीठाच्या अधिनियमानुसार पीएच.डी संशोधनासाठी कालावधी निश्चित केलेला आहे. त्या कालावधीत संशोधन पूर्ण झाले नसेल तर संबंधित प्राधिकरणांकडून संशोधकांना पुनर्नोंदणी करावी लागेल. जे पुनर्नोंदणी करणार नाहीत, त्यांची नोंदणी आपोआप रद्दच होते.-डॉ. वाल्मीक सरवदे, प्र-कुलगुरु

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद