शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत पेट्रोलचे भाव ८५ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:05 IST

पेट्रोलच्या कि मतीने प्रतिलिटर ८५ रुपयांचा भाव पार केला आहे. डिझेलही ७३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे पुन्हा महागाई बोकळणार आहे. ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देनवा उच्चांक : ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत नागरिकांचे मोडले कंबरडे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पेट्रोलच्या कि मतीने प्रतिलिटर ८५ रुपयांचा भाव पार केला आहे. डिझेलही ७३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे पुन्हा महागाई बोकळणार आहे. ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर होत असल्याचे कारण इंधन कंपन्या देत आहेत. मात्र, देशात पेट्रोल-डिझेलवर एवढे कर लादण्यात आले असून, त्याचा मोठा फटका येथील नागरिकांना बसत आहे. पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केली आहे, पण अजूनही याविषयी जीएसटी समितीला निर्णय घेता आला नाही. रविवारी २० रोजी शहरात जेव्हा वाहनधारक पेट्रोलपंपावर गेले व किमतीचे फलक बघून प्रत्येकाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. कारण पेट्रोल ८५ रुपये ३८ पैसे, तर डिझेल ७३ रुपये २0 पैसे प्रतिलिटर विक्री होत होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी १ एप्रिल २०१८ रोजी पेट्रोल ८२ रुपये ६६ पैसे तर डिझेल ६९ रुपये ८७ पैसे प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले होते. मात्र, ५० दिवसांत पेट्रोल २ रुपये ७२ पैसे तर डिझेल ३ रुपये ३३ पैशांनी महागले. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वोच्च भाववाढ ठरली आहे. या भाववाढीने दुचाकी वाहनचालकांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. तर डिझेलमधील भाववाढीच्या भडक्याने मालवाहतुकीचे दर आणखी वाढतील व अंतिमत: नव्याने महागाई बोकळणार आहे. आणखी काही दिवस तरी भाववाढ होत राहील, अशी प्रतिक्रिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.चक्का जामशिवाय नाही पर्याय१ एप्रिल २०१८ रोजी डिझेलचे भाव वाढले होते. त्यानंतर मालवाहतुकीच्या भाड्यात १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आता ५० दिवसांत ३.३३ रुपयांनी डिझेल महागले आहे. यामुळे गाडीभाडे वाढवावे लागणार आहे. एकीकडे भाववाढ होत असताना दुसरीकडे कंपन्यांच्या करारानुसार पूर्वीच्याच दरात मालवाहतूक करावी लागत आहे. याचा मोठा फटका मालवाहतूकदारांना बसत असून, आता देशभरात चक्का जाम आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यासंदर्भात दिल्ली व मुंबई संघटनेत विचारमंथन सुरू आहे.फैय्याज खानअध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना.

टॅग्स :Petrolपेट्रोलAurangabadऔरंगाबादMONEYपैसा