शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

९ जणांचा बळी घेणाऱ्या 'त्या' अपघाताला टँकरमधील अर्धे पाणी कारणीभूत; आरटीओने दिला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:55 IST

औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली. अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली.अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

बिडकीनकडून पाण्याचा खाजगी टँकर (क्रमांक एमएच-१५जी ८४०) ११ मे रोजी नक्षत्रवाडीकडे येत होता. गेवराई तांडा येथील एका ढाब्याजवळ बिडकीनकडून आलेला एक सुसाट दुचाकीस्वार हा औरंगाबादकडे जाण्यासाठी टँकरला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे आला. डाव्या बाजूने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी टँकरचालकाने वेगातील टँकर उजव्या बाजूच्या रस्त्यावर घेतला. त्याचवेळी समोरून रिक्षा येत होती.  

टँकरचालकाने ब्रेक न लावता रिक्षाला जोराची धडक दिली. यावेळी टँकरने रिक्षाला सुमारे पन्नास फुटांपर्यंत फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील प्रवासी खाली पडून टँकरखाली चिरडले गेले. या घटनेची आरटीओ कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये टँकरमध्ये अर्धवट पाणी भरल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. 

टँकर पूर्ण रिकामे करावेटँकरमध्ये अर्धे पाणी भरलेले होते. यामुळे पाणी उसळून अपघाताला आमंत्रण मिळाले. यासंदर्भात पोलीस आणि परिवहन विभागाला अहवाल देण्यात आला आहे. टँकरमध्ये अर्धे पाणी असेल तर सहजपणे ब्रेक लागत नाही. हे अतिशय चुकीचे आहे. टँकर पूर्ण रिकामे केल्यानंतरच चालविले पाहिजे. अशा प्रकारे अर्र्धे पाणी भरणाऱ्या टँकरवर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूauto rickshawऑटो रिक्षाgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीRto officeआरटीओ ऑफीस