शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा पास झाल्यानंतरच मिळणार वडापाव विकण्याला परवानगी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 19:50 IST

ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जात आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम राबविणे सुरू असून, चार तास प्रशिक्षण घेतल्यावर खाद्यपदार्थांविषयी घ्यावयाची काळजी आणि खबरदारीची भूमिका हा महत्त्वाचा विषय आहे. ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे.

काय आहे मोहीम?सध्या वडापाव हा खाद्यपदार्थ सध्या जलद गतीने व सोयीस्कर मिळणारा नाष्टा असल्याने त्यात काही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेत योग्य प्रशिक्षणाची ही मोहीम राबविणे सुरू आहे.

आधी प्रशिक्षण, नंतर परीक्षाशहरात खाजगी संस्थेकडे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. परंतु खाद्यपदार्थ विक्री करताना त्याची गुणवत्ता जपणे निर्भेळ वस्तू ग्राहकांना दिले जावे म्हणून प्रशिक्षण आणि परीक्षा असा नियमच केला आहे.

कोणाला ही परीक्षा द्यावी लागणार?खाद्यपदार्थ बनविण्यासाठी प्रशिक्षण परवाना असणे गरजेचे आहे. त्याशिवाय परवानाच तुम्हाला मिळणे शक्य नाही. जिल्ह्यात व शहरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात कधी ?खाजगी संस्थेकडे ही योजना राबविली असून, त्यानुसार ही फ्री आणि ऑनलाईन परीक्षा तुम्ही पास झाला तरच परवाना दिला जाणार आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

गुणवत्ता राखण्याचा उद्देश..तुम्ही सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्वक पदार्थ उपलब्ध करून दिलेच पाहिजे. त्यात दिलेले नियम व अटी पाळणे खूप गरजेचे आहे. कुणालाही त्रास होता कामा नये. गुणवत्ता राखण्याचा उद्देश आहे.- निखिल कुलकर्णी, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग