शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्याधीग्रस्त अर्भकाच्या गर्भपातास औरंगाबाद खंडपीठाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:36 IST

अर्भकामध्ये गुंतागुंतीच्या शारीरिक व्याधी आढळल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी गठीत केलेल्या समितीने २२ आठवड्यांच्या गर्भवती मातेची तपासणी करून गर्भपातास अनुकूलता दर्शविली. त्यावरून न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि.११) महिलेची गर्भपाताला परवानगी मागणारी याचिका मंजूर केली.

ठळक मुद्देबाळ व आई दोघांच्याही जिवाला धोका निर्माण झाल्यामुळे वैद्यकीय अहवालानंतर खंडपीठाने दिली परवानगी

औरंगाबाद : अर्भकामध्ये गुंतागुंतीच्या शारीरिक व्याधी आढळल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी गठीत केलेल्या समितीने २२ आठवड्यांच्या गर्भवती मातेची तपासणी करून गर्भपातास अनुकूलता दर्शविली. त्यावरून न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि.११) महिलेची गर्भपाताला परवानगी मागणारी याचिका मंजूर केली.गरोदरपणाच्या २२ व्या आठवड्यात मातेच्या केलेल्या सोनोग्राफी अहवालात अर्भकामध्ये गुंतागुंतीच्या शारीरिक व्याधी आढळल्या होत्या. गर्भपात न केल्यास बाळ व आई दोघांच्याही जिवाला धोका होऊ शकतो, असे निदान झाल्यामुळे गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका आईने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.रंजना शिवनारायण नागरे यांनी गरोदरपणाच्या २२ व्या आठवड्यात केलेल्या सोनोग्राफीत गर्भात काही शारीरिक व्याधी आढळून आल्या. गर्भाच्या दोन्ही किडण्या पूर्णपणे सक्षम नाहीत, हृदयाचे कार्यदेखील बाधित झालेले आहे आणि इतर गुंतागुंतीच्या शारीरिक व्याधी निर्माण झाल्या आहेत, असे सोनोग्राफी अहवालात म्हटले होते. रंजना नागरे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी गेल्या असता त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला देण्यात आला; परंतु त्यासाठी त्यांना न्यायालयाची परवानगी घेण्याचे सांगण्यात आले.रंजना नागरे यांनी अ‍ॅड. रवींद्र व्ही. गोरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून गर्भपाताची परवानगी मागितली. अ‍ॅड. गोरे यांनी खंडपीठास विनंती केली की, सदर गर्भवती महिलेची शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. जेणेकरून सोनोग्राफीचा रिपोर्ट पडताळून पाहता येईल. तसेच गर्भपात न केल्यास बाळ व आई दोघांच्याही जिवाला धोका होऊ शकतो.याचिकेवर न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठात बुधवारी सुनावणी झाली असता याचिकाकर्ता महिलेला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी गठीत केलेल्या कमिटीसमोर १० जुलै रोजी वैद्यकीय चाचणीसाठी हजर राहण्याचा आणि कमिटीने सदरील चाचणी करून तात्काळ न्यायालयात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार महिलेच्या गर्भाची तपासणी करून सीलबंद अहवाल अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी खंडपीठात सादर केला. अहवाल याचिकाकर्तीच्या विनंतीस अनुकूल असल्याने खंडपीठाने महिलेच्या गर्भपाताला परवानगी मागणारी याचिका मंजूर केली. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. रवींद्र व्ही. गोरे यांना अ‍ॅड. नारायण मातकर व अ‍ॅड. चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAbortionगर्भपात