शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:46 IST

औरंगाबाद : धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी संपूर्ण राज्यभर धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. औरंगाबाद विभागात ३० रुग्णालयांच्या वतीने ४८४७ रुग्णांची दिवसभरात तपासणी करण्यात आली. 

औरंगाबाद : धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी संपूर्ण राज्यभर धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. औरंगाबाद विभागात ३० रुग्णालयाच्या वतीने ४८४७ रुग्णांची दिवसभरात तपासणी करण्यात आली. धर्मादाय न्यास रुग्णालयातर्फे एकाच वेळी आरोग्य तपासणी मोहिम राबविण्याची ही पहिलीच वेळ ठरली. औरंगाबाद सह विभागातील जालना, परभणी व नांदेड येथे धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने विविध परिसरात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांपासून ते रुग्णवाहिकेपर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. यासंदर्भात धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागाअंतर्गत औरंगाबादेत १९ रुग्णालयानी ३५२७ रुग्णांची तपासणी केली. जालना ३ रुग्णालयांनी ४२०, परभणी ५ रुग्णालयांनी ५०० तर नांदेड येथील ३ रुग्णालयांनी ४०० रुग्णांची तपासणी केली. असे ३० रुग्णालयाने ४८४७ रुग्णांची दिवसभरात तपासणी केली. औरंगाबादेत धर्मादाय रुग्णालयांच्या वतीने गावंदरी तांडा, जटवाडा. घृष्णेश्वर चौक, जाधववाडी, नारेगाव. बजाजनगर. सुलीभंजन, भिमनगर, सिडको एन-६ ,  सातारा. राहुलनगर बुद्धविहार जालाननगर. विजयननगर, गारखेडा. हर्सूल, महालपिंप्री. राजर्षी शाहुनगर, रामनगर. शरीफ कॉलनी, कटकटगेट. वरूड काजी. सिल्कमिल कॉलनी. माळीवाडा व बदनापुर. येथ आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.धर्मादाय न्यास रूग्णालयांमध्ये गरीब रुग़्णांवर (ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारच्या आत आहे) त्यांना मोफत तसेच दुर्बल घटकांतील रुग्णांवर (ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखच्या आत आहे) त्यांना सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहे.  विविध शिबीराची पाहणी उपआयुक्त विवेक सोनुने यांच्यासह सहाय्यक आयुक्तांनी केली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल