शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

वॉटरग्रीडच्या बैठकीला मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:07 PM

मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.

ठळक मुद्देअनास्था : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रकल्प होत असताना इच्छाशक्तीचा अभाव

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी योजना विभागात होण्याचे संकेत असतानाच लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्यामुळे या योजनेबाबतचे गौडबंगाल वाढले आहे.या बैठकीला मराठवाड्यातील पालकमंत्री, विधान परिषद, विधानसभा सदस्य, जि.प. अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. भाऊसाहेब चिकटगावकर व अन्य एक विधानसभा सदस्याची व परभणी जि.प. अध्यक्षांची बैठकीला हजेरी होती. पालकमंत्री, आमदार, महापौर यांना निमंत्रित केलेले असताना ते का आले नाहीत, यावर पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी सांगितले, वॉटरग्रीडच्या बैठकीसाठी सर्वांना फोन केले होते; परंतु अनेक जण आले नाहीत.आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रीडच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात उजनीतील पाणी मांजरा धरणात आणून मराठवाड्यातील ४० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात इसापूरचे पाणी उर्ध्व मानार धरणक्षेत्रात आणणे, तसेच जायकवाडीवरील धरणाक्षेत्रातून पाणी आणणे. जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणक्षेत्रात नेणे. ८ जिल्ह्यांतील ६० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. यासाठी ८ हजार ५०० कोटी असा १५ हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प होता. १५ कोटी (डीपीआर) सविस्तर प्रकल्प अहवालासाठी तरतूद करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रित ग्रीड करण्याच्या सूचना केल्या.शिवसेनेची बैठकीकडे पाठआजवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही बैठकीला हजेरी लावणारे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, महापौर, जि.प. अध्यक्षांनी मराठवाडा वॉटरग्रीडच्या बैठकीकडे पाठ फिरविली. १५ दिवसांनंतर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, त्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहतील, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMember of parliamentखासदारMLAआमदार