शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये केलेल्या कामांची देयके थकली; बांधकाम विभागाला ९१ कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 13:27 IST

यंदा लॉकडाऊन काळात विशेष रस्ते दुरुस्ती व रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती या दोन लेखाशीर्ष अंतर्गत कामे करण्यात आली.

ठळक मुद्देबांधकाम विभागाने जुलै महिन्यात या निधीची मागणी सरकारकडे केली आहे. औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील कामांची देयके थकीत

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामांची तब्बल ९१ कोटींची देयके थकली असल्यामुळे अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी कामे बंद केली आहेत. हा निधी मिळण्यासाठी बांधकाम विभागाने शासनाकडे मागणी केली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध लेखाशीर्षअंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी केली जाते. औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत रस्ता दुरुस्तीच्या कामांची ९१ कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. बांधकाम विभागाने जुलै महिन्यात या निधीची मागणी सरकारकडे केली आहे. अद्याप शासनाकडून हा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे कशी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदा लॉकडाऊन काळात विशेष रस्ते दुरुस्ती व रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती या दोन लेखाशीर्ष अंतर्गत कामे करण्यात आली.

यामध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यालगत रेनकट, ड्रेन करून देणे ही कामे केली गेली. तत्कालीन शासनाने तीन वर्षांपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी दोन वर्षांसाठी कंत्राट दिले होते. त्याची मुदत संपल्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय झालेला नाही. मात्र, खड्डे भरणे आवश्यक होते. त्यात कोरोना लॉकडाऊन जाहीर झाले. या काळात रस्त्यांची कामे केली गेली. त्यात विशेष दुरुस्ती व किरकोळ दुरुस्तीअंतर्गत डांबरीकरण, मजबुतीकरण कामांचा समावेश होता. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मिळून विशेष दुरुस्तीची ६८ कोटींची, तसेच किरकोळ दुरुस्तीची २३ कोटी रुपयांची कामे केली आहेत. ९१ कोटी रुपयांची बिले अदा करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी के लीे. 

कंत्राटदारांचेही लक्षबिले थकीत असल्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित कंत्राटदारांनी कामे बंद केली आहेत. काही ठिकाणी पावसामुळे कामे बंद आहेत. ही थकीत बिले मिळाली, तर कंत्राटदारांना कामे सुरू करता येतील. त्यामुळे बांधकाम विभागाबरोबर कंत्राटदारांचे लक्ष निधीकडे लागले आहे.  

टॅग्स :fundsनिधीroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद