शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ६५ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 20:10 IST

जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

औरंगाबाद : नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांवर कारवाईसाठी शहर पोलीस दलात आणखी एका विभागाची भर टाकण्यात आली, असे असले तरी प्रत्यक्षात मात्र गतवर्षीच्या तुलनेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणारी कारवाई निम्म्यावर आल्याचे समोर आले. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही रोज भर पडते आहे. वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज, छावणी, सिडको आणि शहर विभाग क्रमांक १ आणि २, असे पाच विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक आहेत. १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी या कालावधीत झालेल्या कारवाईच्या तुलनेत ही कारवाई निम्मीच आहे. गतवर्षी जानेवारी ते आॅगस्टदरम्यान नियम मोडणाऱ्या १ लाख २० हजार ५०८ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले होते. या वाहनचालकांकडून ३ कोटी १९ लाख ७२ हजार ३५० रुपये दंड वसूल केला होता. 

एका वाहतूक विभागाची पडली भरगतवर्षी शहरात चार वाहतूक विभाग होते. यावर्षी यात आणखी एका विभागाची भर पडली. त्यासाठी पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी, कर्मचारीही देण्यात आले. असे असले तरी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाईत मोठी घट झाल्याचे दिसून येते.

अडीच हजार वाहन- चालकांनी भरला आॅनलाईन दंडसेफ सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोस्टामार्फत घरपोच नोटिसा पाठविण्याचा उपक्रम एक महिन्यापूर्वी सुरू झाला. वाहनचालकांना अ‍ॅक्सिस बँक आणि पोस्टात दंडाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. वाहनचालकांस घरपोच नोटीस मिळाल्यानंतर १४ दिवसांत दंड भरणे बंधनकारक आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कोर्टात खटला दाखल केला जातो. महिनाभरात २ हजार ६२४ वाहनचालकांनी १ लाख ७७ हजार ५१८ रुपये दंड बँक आणि पोस्टात जमा केला.

बंदोबस्तामुळे कारवाईला वेळच नाहीजानेवारीपासून आॅगस्टपर्यंत शहरात झालेल्या विविध दंगलींच्या काळात वाहतूक पोलीस बंदोबस्तात होते. परिणामी, कारवाई घटली.-एच.एस. भापकर, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस