शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पादचाऱ्यांनो, खास तुमच्यासाठी शहरातील ३ रस्ते मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 15:21 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबाद महानगरपालिकेचा सहभाग

ठळक मुद्देनागरिकांसाठी सुरक्षित जागांची निर्मिती, सौंदर्यीकरण आणि आर्थिक प्रगतीच्या विचार करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद : नागरिकांना सहजपणे व सुरक्षित पायी चालता यावे, या हेतूने औरंगाबाद शहर ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सहभागी होत आहे. शहरातील कॅनॉट सर्कल, क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठण गेट ते गुलमंडी या तीन रस्त्यांची निवड या पायलट प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. 

केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या योजनेचा उद्देश शहरातील रस्त्यांच्या आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुलां-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कोरोना संसर्गातून ग्रीन रिकव्हरी करणे असा आहे. औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएस्सीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी एएस्सीडीसीएल आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून  कॅनॉट सर्कल, क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठण गेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड पायलट प्रोजेक्ट म्हणून  केली आहे. सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर यांच्या नेतृत्वाखाली एएस्सीडीसीएलचे एक पथक, अर्बन रिसर्च कॉलेब्रेटिव्हचे श्रीनिवास देशमुख आणि पल्लवी देवरे मागील एक महिन्यापासून या प्रकल्पासाठी विविध मापदंडाआधारे रस्त्यांचे सर्वेक्षण करीत होते. पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी करताना पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित जागांची निर्मिती, सौंदर्यीकरण आणि आर्थिक प्रगतीच्या विचार करण्यात येणार आहे. 

नागरिकांच्या मदतीने राबविलेला प्रकल्पहा प्रकल्प नागरिकांसाठी असून, नागरिकांच्या मदतीने अमलात येणार आहे. शहरातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सिटीझनस ग्रुप, वास्तुविशारद, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी या प्रकल्पात औरंगाबाद महानगरपालिका आणि एएस्सीडीसीएल यांना सहकार्य करावे. नोव्हेंबर महिन्यात काही स्ट्रीट इव्हेंट्सचे नियोजन करण्यात येणार  असून, सदरील मोहिमेत नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, तसेच या मोहिमेबाबत माहितीही मिळणार आहे.- आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका