शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:12 IST

पंतप्रधान पीक विमा योजना यंदा योग्य नियोजनाअभावी गोंधळामुळेच अधिक चर्चेत आली़ एकाच दिवशी तीन-तीन आदेश, कधी आॅफलाईन तर कधी आॅनलाईन, बँकेत अन् सेतू केंद्र अशा एकापेक्षा एक अफलातून घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकºयांना वेठीस धरण्यात आले होते़ दिवसरात्र रांगेत लागून शेतकºयांनी एकदाचा पीक विमा भरलाही़, परंतु आता बँकांना तो कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करावयाचा असताना पोर्टलवरील १०७ गावांची नावेच त्यातून गायब आहेत़ त्यामुळे या गावातील जवळपास ५० हजार शेतकºयांचा पीक विमा गोत्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजना यंदा योग्य नियोजनाअभावी गोंधळामुळेच अधिक चर्चेत आली़ एकाच दिवशी तीन-तीन आदेश, कधी आॅफलाईन तर कधी आॅनलाईन, बँकेत अन् सेतू केंद्र अशा एकापेक्षा एक अफलातून घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकºयांना वेठीस धरण्यात आले होते़ दिवसरात्र रांगेत लागून शेतकºयांनी एकदाचा पीक विमा भरलाही़, परंतु आता बँकांना तो कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करावयाचा असताना पोर्टलवरील १०७ गावांची नावेच त्यातून गायब आहेत़ त्यामुळे या गावातील जवळपास ५० हजार शेतकºयांचा पीक विमा गोत्यात आला आहे़पंतप्रधान पीक विमा योजनेत अगोदर ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती़ त्यामुळे नोटबंदीनंतर जिल्हाभरात पुन्हा एकदा बँकांबाहेर शेतकºयांच्या दिवसरात्र रांगा लागल्या होत्या़ रात्रभर शेतकºयांनी बँकांबाहेरच मुक्काम ठोकला होता़ गतवर्षी जिल्ह्यात एकूण ७ लाख ६७ हजार शेतकºयांच्या पिकांना विम्याचे कवच होते़ त्यांना नुकसान भरपाईपोटी विक्रमी ५०२ कोटी रुपये मिळाले होते़ त्यामुळे यंदाही पिके वाया गेली तर पीक विमा तरी हातात पडेल़ या आशेने जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख शेतकºयांनी पीक विमा भरला़, परंतु ३१ जुलैला मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास दोन लाखांवर शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार होते़ त्यानंतर शासनाने पाच आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश काढले, परंतु १ आॅगस्टला दिवसभर बँकांमध्ये हे आदेश पोहोचलेच नाहीत़ त्यानंतर पुन्हा आदेश काढून ही मुदत ४ आॅगस्ट करण्यात आली़ तसेच बँकेत आणि सेतू केंद्रात स्वीकारण्याबाबतही दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले़ त्यामुळे सगळाच गोंधळ उडाला़ त्यात सेतू केंद्र आणि इतर बँकांनी पीकविमा आॅनलाईन भरुन घेतला़ तर जिल्हा बँकेला मात्र आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही प्रकारे पीक विमा स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते़ त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने आॅफलाईनही पीकविमा स्वीकारला़ त्यानंतर आता आॅफलाईन स्वीकारलेला पीक विमा कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केले होते़, परंतु पोर्टलवर माहिती अपलोड करताना, कर्मचाºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला़ ही माहिती भरण्यासाठी कर्मचाºयांना जागरणही करावे लागले असून त्यापूर्वीच बँकेने विमा कंपनीला सर्व शेतकºयांची रक्कम पाठवून दिली होती़आता मात्र कंपनीच्या पोर्टलवरुन जिल्ह्यातील जवळपास १०७ गावांची नावेच गायब असल्याचे लक्षात येताच अधिकाºयांनाही धक्का बसला़ अनेक गावे दुसºयाच महसूल मंडळात टाकण्यात आली आहेत़माहूर तालुक्यात चार महसूल मंडळ असताना पोर्टलवर मात्र पाच महसूल मंडळ दाखविण्यात येत आहेत़ आंबुलगा हे गाव माहूर महसूल मंडळात दाखविण्यात येत आहे़ अशाप्रकारे पोर्टलवर गावांची नावे आणि त्यांच्या महसूल मंडळांमध्ये चुका करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे या गावातील पीकविम्याची माहिती पोर्टलवर भरता येणे शक्य नाही़पोर्टलवरील यादीत नसलेल्या या १०७ गावांचा पीक विमा स्वीकारावा असे पत्र बँकेने कंपनीला पाठविले आहे, परंतु कंपनीकडून मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बँकेने थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे़जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही विमा कंपनीशी चर्चा केली आहे़ त्याबाबत कंपनीशी अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही अपेक्षित तोडगा निघाला नाही़ त्यामुळे या १०७ गावांतील जवळपास ५० हजार शेतकºयांचा पीक विमा गोत्यात आला आहे़