शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:01 IST

शासकीय सहायता निधीत देणगी देण्याची अनेकांनी व्यक्त केली इच्छा 

ठळक मुद्देरोहयोवरील मजुरांना २०६ रुपये मानधन निवडणुकीत काम करणाऱ्यांना २५० रुपये मानधन आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे मानधन तुटपुंजे असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांतून उमटत आहेत. तुटपुंज्या मानधनावरून कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. रोहयोवरील मजुरांना २०६, तर निवडणुकीत काम करणाऱ्यांना २५० रुपये मानधन आहे. हे मानधन नको म्हणून अनेकांनी शासकीय सहायता निधीत ते जमा करून टाकण्याचे मतही जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तुटपुंजे मानधन आणि तेही वेळेवर नाही, शिवाय निवडणुकीचे काम करताना सक्ती, वरिष्ठांकडून होणारा शाब्दिक व मानसिक छळ. या सगळ्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होतो आहे. या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हतबल असून, राष्ट्रीय कर्तव्याच्या नावाखाली त्यांनी निमूटपणे निवडणुकीचे काम केले. आता मतमोजणीसाठी कर्मचारी निमूटपणे काम करणार आहेत. कमी मानधन आणि ते मिळविण्यासाठी त्रास अधिक असल्याने काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला तुटपुंजे मानधन नको, कुठे तरी देणगी देऊन टाका, अशा शब्दात कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला प्रशिक्षण शिबिरात सुनावले. 

२३ एप्रिल रोजी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २०२१ मतदान केंद्रांबाहेर नियुक्त करण्यात आलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी, अतिरिक्त केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), अंगणवाडी सहायक, पोलीस आदींचा समावेश होता, या कर्मचाऱ्यांना एका दिवसाचे केवळ २५० रुपये मानधन देण्यात आले, तर शिपायांची १५० रुपयांवर बोळवण केली. लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये केंद्र अध्यक्षांना प्रशिक्षण व मतदान दिवस असे ४ दिवसांचे मिळून दररोज ३५० रुपये मानधन देण्यात आले, तर केंद्रावरील सर्व मतदान अधिकाऱ्यांना प्रत्येक दिवसाचे २५० रुपये देण्यात आले.

धोका जास्त; मानधन कमीनिवडणूक प्रक्रियेत काम करताना धोका जास्त आणि मानधन कमी अशी अवस्था झाली आहे. या कामात वर्ग १ व वर्ग २ दर्जाचे अधिकारी नियुक्त केले असून, त्यांना दीड हजार रुपये मानधन देण्यात आले. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ते तुटपुंजे मानधन देणगी स्वरूपात देण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले, मानधन सर्वत्र समान आहे, कुठेही कमी-जास्त असा प्रकार नाही. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादfundsनिधी