शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या १९ अभियंत्यांवर वेतन कपातीची कारवाई; वसुली मोहिमेत हयगय नडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:12 IST

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल १ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.

ठळक मुद्देविभागांतर्गत एक हजार कोटींची थकबाकी३४ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : दिवसेंदिवस वीज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल १ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, महावितरणने थकबाकी वसुली मोहीम गतिमान केली असून, या मोहिमेत हयगय केल्यामुळे औरंगाबाद परिमंडळांतर्गत १९ अभियंत्यांचे वेतन कपात करण्यात आले आहे, तर ३४ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

महावितरणने थकबाकी वसुली मोहीम हाती घेतली असून, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील काही अभियंते व अन्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याची बाब मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या निदर्शनास आली. थकबाकी वसुलीची ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना असतानादेखील अभियंते व कर्मचाऱ्यांपैकी काही जणांनी या मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला नाही. वसुलीबाबत निष्काळजीपणा दाखविला, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ४ व जालना जिल्ह्यातील १५ अभियंत्यांचे नोव्हेंबर महिन्याचे एकतृतीयांश वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिले. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील २० व जालना जिल्ह्यातील १४ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे महावितरणचे अभियंत्यांत व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहक, शहरातील पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व अन्य अशा २ लाख ३० हजार ७०४ वीज ग्राहकांकडे १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. महावितरणने वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात १३२ कोटींची थकबाकी- औरंगाबाद परिमंडळात घरगुती वीज वापराच्या ३४ हजार १९७ ग्राहकांकडे ५२.७० कोटी रुपये - व्यापारी वीज वापराच्या ४ हजार ४८५ ग्राहकांकडे ८.६८ कोटी रुपये - औद्योगिक १ हजार ४७१ ग्राहकांकडे ४.५१ कोटी रुपये- १ हजार ७७९ सार्वजनिक पाणीपुरवठाकडे ५४.५० कोटी रुपये- ४४८ पथदिवे जोडण्यांकडे ८.७८ कोटी रुपये- ९२६ इतर ग्राहकांकडे २.८८ कोटी रुपयेएकूण ४३ हजार ३०६ वीज ग्राहकांकडे १३२.८७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिलAurangabadऔरंगाबाद