शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
9
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
10
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
11
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
12
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
13
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
14
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
15
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
16
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
17
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
18
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
19
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
20
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

उपराष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी ५ हजार ९०० भरा; सरकार यंत्रणेतील अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:15 IST

सरकार यंत्रणेतील अजब कारभार; राजशिष्टाचार विभाग आणि एमटीडीसीमध्ये चांगलीच जुंपल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगर : महसूल आणि एमटीडीसी या दोन्ही यंत्रणा शासकीय आहेत. राजशिष्टाचारप्रमाणे येणाऱ्या व्हीआयपी व्यक्तींसाठी या विभागांना सुविधा देण्याची जबाबदारी असताना एमटीडीसीने महसूल प्रशासनाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे हेलिकॉप्टर वेरूळ येथील हेलीपॅडवर उतरण्यासाठी ५ हजार ९०० रुपयांची मागणी करणारे पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली.

उपराष्ट्रपती हे देशातील प्रशासकीय यंत्रणेच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. त्यांचा राजशिष्टाचार हा शासकीय स्तरावर संवैधानिकदृष्ट्या पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते कोणत्याही विभागाच्या कार्यक्रमाला येणार असले तरी सरकारी यंत्रणांना एकत्रितपणे काम करणे गरजेचे असताना एमटीडीसीने राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना हेलीपॅडचे शुल्क भरण्यासह सुरक्षेच्या परवानग्या व इतर मुद्दे उपस्थित करणारे पत्र दिले. यावरून राजशिष्टाचार विभाग आणि एमटीडीसीमध्ये चांगलीच जुंपल्याची चर्चा आहे.

काय म्हटले आहे पत्रात२२ राेजी उपराष्ट्रपती धनकड हे सपत्नीक शहरात येत आहेत. ते हेलिकॉप्टरने वेरूळ येथे जाणार आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर एमटीडीसीच्या हेलीपॅडवर उतरेल. त्या ग्राऊंडचे शुल्क ५ हजार प्रतिदिन व १८ टक्के जीएसटी मिळून ५९०० रुपये रक्कम महामंडळास अदा करावी. त्यासाठी बँकेच्या नावासह खाते क्रमांक नमूद करून एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. प्रशासकीय यंत्रणेतील हा बेबनाव पत्रामुळे चव्हाट्यावर आला.

‘एमटीडीसी’ला समजावलेउपराष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त अशी मागणी करणारे पत्र आल्याने राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी रामदास दौड यांनी एमटीडीसीला याबाबत विचारणा केली. प्रशासकीय यंत्रणेच्या प्रोटोकॉलच्या जबाबदारी संबंधितांना समजून सांगितली. याप्रकरणी दौड यांना संपर्क केला असता ते म्हणाले, दोन्ही संस्था प्रशासकीय यंत्रणेचा भाग आहे. त्यामुळे त्यांना याबाबत समजावण्यात आले आहे.

दुसऱ्या क्रमांकाचे घटनात्मक पदभारताचे उपराष्ट्रपती हे देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमनपदाची जबाबदारीदेखील उपराष्ट्रपतींवर असते. २०२२ पासून जगदीप धनखड हे देशाचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद