शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासूनचा जीएसटी भरा; एमआयडीसीच्या नोटिसांमुळे उद्योजकांत खळबळ

By बापू सोळुंके | Updated: June 16, 2023 12:56 IST

विविध सेवांवरील जीएसटी विलंब शुल्कासह भरण्याच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना पाठवल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ‘सहा वर्षांपासूनचा जीएसटी व्याजासह भरा’ अशा थेट नोटिसा बजावण्यात आल्याने शहरातील उद्योजकांमध्ये एकच खळबळ उडाली. जीएसटीची वसुली एमआयडीसीमार्फत केलीच नाही. या अक्षम्य चुकीचा भुर्दंड राज्यभरातील उद्योजकांना पडणार आहे.

१ जुलै २०१७ ते ४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घेतलेल्या विविध सेवांवरील जीएसटी विलंब शुल्कासह भरण्याच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना पाठवल्या आहेत. एमआयडीसीने जेव्हाच्या तेव्हा जीएसटीची वसुली केली नाही, यामुळे मागील सहा वर्षांचा जीएसटी व्याजासह भरावा लागणार आहे असे मसिआ संघटनेने सांगितले.

महाराष्ट्रामध्ये सन २०१७ पासून वस्तू व सेवा कर लागू झाला. राज्य आणि केंद्र सरकारचा स्वतंत्र असा सेवा कर विविध सेवांवर लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक वसाहतीमधील भूखंडावर उद्योग करणाऱ्या उद्योजकांना विविध सेवांवर जीएसटी लागू करणे बंधनकारक होते. ही बाब जीएसटी विभागाच्या विशेष तपासणीमध्ये समोर आली. यानंतर जीएसटीच्या दक्षता विभागाने एमआयडीसी कार्यालयास नोटीस बजावून १ जुलै २०१७ ते ४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एमआयडीसीने उद्योजकांना दिलेल्या विविध सेवांवर जीएसटी वसूल करून तत्काळ जमा करावी असे सांगितले. ३० एप्रिल २०२३ या तारखेपर्यंत व्याज आकारणी करून जीएसटी शुल्क जमा करण्याचे निर्देश दिले होते पण कारवाई झालेली नाही.

एमआयडीसीने उद्योजकांना नेमक्या कोणत्या दिल्या सेवासहा वर्षांत एमआयडीसीने उद्योजकांना नवीन नळ जोडणी, नवीन ड्रेनेज लाइन कनेक्शन, बांधकाम परवानगी, भूखंड हस्तांतरण करणे, नवीन भूखंड विक्री व्यवहार, उद्योजकांचे पोटभाडेकरूची एमआयडीसीकडून परवानगी घेणे, रस्ते दुरुस्ती, पाणी ,भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र, विकास शुल्क, भूखंडाचा वापर बदलण्याची परवागनी देणे, कंपनीचे नावात बदल, पर्यावरण शुल्क, लिफ्ट चार्जेस, फायर सर्विसेस. भूखंड भाडेतत्त्वाचा व्यवहार यासह अन्य सेवांवर जीएसटी शुल्क आणि व्याजासह सात दिवसात जमा करण्याच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना बजावल्या आहेत. कमीत कमी १५ ते २० हजार रुपये ते एक लाखापर्यंतच्या रकमेच्या या नोटिसा असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

चूक एमआयडीसीची अन भुर्दंड उद्योजकांनाएमआयडीसीने जेव्हाच्या तेव्हा प्रत्येक व्यवहारावर उद्योजकांकडून जीएसटी वसूल करून घेणे आवश्यक होते. मात्र एमआयडीसीने आमच्याकडून जीएसटी घेतली नाही. आता त्यांनी उद्योजकांना सन २०१७पासून आतापर्यंतच्या सेवांवरील जीएसटी व्याजासह सात दिवसात भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. एमआयडीसीने केलेल्या चुकीचा उद्योजकांना भुर्दंड बसत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सात दिवसांत जीएसटी भरण्याच्या नोटिसा देणे अन्यायकारक आहे.-अनिल पाटील, अध्यक्ष मसिआ संघटना

टॅग्स :GSTजीएसटीbusinessव्यवसायAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी