शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाकडे लक्ष द्या, लक्षणांकडे दुर्लक्ष नको; नाहीतर डाॅक्टर म्हणतील ‘आय ॲम साॅरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 19:34 IST

‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा, ६० टक्के रुग्ण रुग्णालयात पोहोचण्याआधीच दगावतात

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : छातीत दुखण्याचा त्रास, ॲसिडिटीमुळे त्रास होत असेल, जास्त दगदग झाली असेल, अशी अनेक कारणे पुढे करून रुग्ण दुर्लक्ष करतात. परिणामी, वेळेवर उपचार न मिळाल्याने ६० टक्के रुग्ण हे रुग्णालयात पोहोचण्याआधीच दगावतात आणि शेवटी ‘आय ॲम साॅरी...’ हे डाॅक्टरांचे शब्द नातेवाइकांना ऐकावे लागतात. त्यामुळे हृदयाच्या त्रासाकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला.

हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अजित भागवत म्हणाले, हृदयविकाराच्या झटक्याचे १० पैकी ६ रुग्ण हे रुग्णालयात येण्यापूर्वीच दगावतात. हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. शिरीष देशमुख म्हणाले, ॲसिडिटीत कधीही घाम येत नाही. ॲसिडिटी ही सामान्य बाब आहे; पण छातीत जळजळ होऊन घाम येणे ही हृदयविकार असण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला ‘सीपीआर’ दिल्याचा फायदा होतो. हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. श्रेयस रुणवाल म्हणाले, हृदयविकाराच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये.

‘गोल्डन अवर’ महत्त्वाचाहार्ट अटॅकची लक्षणे जाणवल्यानंतर पहिला एक तास म्हणजे ‘गोल्डन अवर’ म्हटला जातो. यावेळेत योग्य उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव धोक्याबाहेर येण्यास मदत होते. या पहिल्या तासात हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा मोकळा करण्यात आला, तर हृदयाला इजा होण्यापासून थांबविता येते.

हा रुग्ण वाचला, कारण...छातीत दुखते म्हणून रुग्णालयात आलेला तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अचानक कोसळल्याची घटना औरंगाबादेतील जिल्हा रुग्णालयात जानेवारीअखेरीस घडली. नाडीही बंद होती, पण २० मिनिटांत डाॅक्टर आणि परिचारिकांनी सीपीआर, तीन वेळा शाॅक ट्रीटमेंट देऊन जीव वाचवला. नंतर अँजिओप्लास्टी झाली. या तरुणाने नंतर डाॅक्टरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. त्याला काही दिवसांपासून छातीत दुखण्याचा त्रास सुरू होता. काही होत नाही म्हणून दुखणे अंगावर काढत होता; मात्र मित्राच्या सल्ल्यामुळे तो रुग्णालयात आला व रुग्णालयातच कोसळला होता.

हार्ट अटॅकची लक्षणे...- श्वास घेण्यास त्रास.-खूप थकवा येणे.- छातीत जळजळ होऊन घाम येणे.- चक्कर येऊन उलटी होणे.- एक हात दुखणे, पाठ दुखणे.- जबडा दुखणे.-हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जास्त जोरात होणे-अचानक खूप वजन कमी होणे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeart Attackहृदयविकाराचा झटका