शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात

By संतोष हिरेमठ | Updated: July 29, 2022 19:58 IST

ग्रामीण भागांतील रुग्ण, नातेवाईकांचा खिसा केला जातोय रिकामा

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : दिव्यांग प्रमाणपत्र पाहिजे, मग १४०० रुपये द्या आणि प्रमाणपत्र घ्या...असे सांगून एजंटांकडून घाटी रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचा खिसा रिकामा करण्याचा उद्योग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाटीतील लोकांना पैसे द्यावे लागतात, हा बहाणा सांगून पैसे उकळले जात आहे.

घाटी रुग्णालयातील मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागात फुलंब्रीहून भावाचे दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी एक व्यक्ती आली. दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यासाठी त्याने एका एजंटाला १४०० रुपये दिले. हा एजंट त्यांच्यासोबत घाटीत फिरत होता परंतु ओपीडीतील पावती काढण्यापासून तर डाॅक्टरांना दाखवेपर्यंतची सर्व कामे हा व्यक्तीच करत होता. एजंट फक्त सोबत करत होता. यादरम्यान शासकीय शुल्काव्यतिरिक्त पैसे द्यावे लागले नाही. हे लक्षात येताच त्या व्यक्तीने एजंटाला धरून मनोविकृती चिकीत्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे, डाॅ. प्रदीप देशमुख, समाजसेवा अधीक्षक नरेंद्र भालेराव यांच्यापुढे उभे केले. तेव्हा एजंटाने पैसे परत देऊ, असे सांगितले. याविषयी संबंधित एजंटाविरोधात पोलिसांत तक्रार देण्याची सूचना डाॅक्टरांनी केली.

अवघे ७० रुपये शुल्कघाटी रुग्णालयातील मनोविकृती विभागात दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी २० रुपये ओपीडी शुल्क आणि ५० रुपये तपासणी शुल्क लागते. रुग्णालयात एक्सरे काढावा लागला तर त्याचे पैसे लागतात. त्याशिवाय कोणतीही रक्कम रुग्णालयात लागत नाही, असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी घाटीबाहेर वेगवेगळे शुल्क आकारले जातात.

माझ्यासारखी इतरांची फसवणूक नकोभावाचे दिव्यांग प्रमाणपत्र काढून देतो म्हणून १४०० रुपये घेतले. ओपीडी शुल्क मीच भरले. रांगेत उभे राहण्यापासून तर झेराॅक्स आणण्यापर्यंतची कामे मीच केली. घाटीत अवघे ७० रुपयांचे शुल्क लागले. त्यामुळे १४०० रुपये घेऊन आपली फसवणूक झाली. २०० रुपये रोजंदारीने मी काम करतो. माझ्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये.- फसवणूक झालेला रुग्णाचा भाऊ

केवळ शासकीय शुल्क, सतर्क राहावेदिव्यांग प्रमाणपत्रासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणतीही रक्कम आकारली जात नाही. अशाप्रकारे कोणी जर प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे मागत असेल तर सतर्क झाले पाहिजे. कोणतीही रक्कम देऊ नये. संबंधित व्यक्तीला पोलिसांत तक्रार देण्याचे सांगण्यात आले आहे.- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल