शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चक्क महिनाभरात तडकले जिल्हाधिकारी कार्यालयातील पेव्हर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:43 IST

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील उपविभागीय दंडाधिकार्‍यांच्या कार्यालय आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बसविण्यात आलेले पेव्हरब्लॉक महिनाभरात तडकले आहेत.

ठळक मुद्दे४०० हून अधिक ब्लॉक फुटल्यामुळे हे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. २ लाख रुपयांच्या कामात निकृष्टपणाचा कळस गाठला असून, फुटलेल्या ब्लॉकवर जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांकडून क्रमांक टाकून घेतले आहेत.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील उपविभागीय दंडाधिकार्‍यांच्या कार्यालय आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बसविण्यात आलेले पेव्हरब्लॉक महिनाभरात तडकले आहेत. २ लाख रुपयांच्या कामात निकृष्टपणाचा कळस गाठला असून, फुटलेल्या ब्लॉकवर जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांकडून क्रमांक टाकून घेतले आहेत. ४०० हून अधिक ब्लॉक फुटल्यामुळे हे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

या कामाप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र देण्यात आले आहे. तातडीने दुरुस्ती करण्याच्या नावाखाली या कामाच्या खर्चाला मंजुरी घेण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाने ते काम एका मजूर सहकारी संस्थेला दिले. महिनाभरापूर्वीच ते काम हाती घेण्यात आले. पूर्ण ब्लॉक बसविण्याचे काम झाल्यानंतर काही दिवसांतच ब्लॉकला तडे गेले. त्यामुळे हे काम निकृष्ट असल्याचे लक्षात येते, उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी फुटलेल्या ब्लॉकवर क्रमांक टाकून त्याची मोजणी केली. त्या कामाचे बिल अदा केले असून, ते ब्लॉक बदलणार की तसेच राहणार याबाबत उपअभियंता वाकळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

वाळूच्या ट्रक्समुळे फुटले असतीलउपविभागीय कार्यालयाच्या आवरात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे फुटपाथवर बसविण्यासाठी वापरले जाणारे ब्लॉक आहेत. कंत्राटदार संस्थेने काम केले तेव्हा ब्लॉक चांगले होते. त्या ब्लॉकचे टेस्टिंग केले होते. त्यावरून वाळूचे ट्रक गेल्यामुळे ते फुटले का, हे पाहावे लागेल. कार्यालय आवारात नागरिकांची वर्दळ असल्यामुळे तेथे फुटपाथसाठी वापरण्यात येणारे ब्लॉक बसविले. वाळूच्या व इतर वाहनांच्या वजनामुळे ते फुटले असतील तर बदलून देण्याचा प्रयत्न करू. २ लाखांच्या आसपास त्यावर खर्च झाला असेल, असे अभियंता कदीर अहमद यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद