जालना : परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका महिलेस विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली. उपचारादरम्यान घेतलेल्या जवाबावरून ८ नोव्हेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोदा माव येथील वंदनाबाई रामजी खवल यांना गावातील परमेश्वर लकासे यांने ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून शिवीगाळ केली होती. शिवीगाळ का केली म्हणून वंदनाबाई व त्यांचे पती रामजी हे लकासे यांच्या घरी गेले असता तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच वंदनाबाई यांना विषारी द्रव्य पाजले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले होते. तेथे त्यांचा जवाब घेण्यात आला. त्यावरून परमेश्वर लकासे, रामा लकासे व रूख्मीनबाई लकासे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोद्यात महिलेस विष पाजले
By admin | Updated: November 8, 2015 23:35 IST