शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्राॅमा’तील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 01:30 IST

Aurangabad : घाटीतील सर्जिकल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ट्राॅमा केअर युनिट आहे. याठिकाणी शनिवारी दुपारपासून वीजपुरवठा विस्कळीत होण्याची समस्या सुरू झाली.

औरंगाबाद : गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर म्हणजे जीव वाचविणारी यंत्रणा... परंतु व्हेंटिलेटर अचानक बंद पडले तर काय, याचा विचारच न  केलेला बरा; परंतु या प्रकाराला सोमवारी भल्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घाटीतील ट्रॉमा केअर युनिटमधील रुग्णांना सामोरे जावे लागले. विद्युत यंत्रणेतील बिघाडाने येथील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास देण्याची वेळ ओढवली. त्यामुळे नातेवाईक, डाॅक्टर, परिचारिकांची धावपळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही.घाटीतील सर्जिकल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ट्राॅमा केअर युनिट आहे. याठिकाणी शनिवारी दुपारपासून वीजपुरवठा विस्कळीत होण्याची समस्या सुरू झाली. त्यामुळे अन्य बाजूच्या इमारतीतून वीजपुरवठा करण्यात आला. सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पुन्हा वीज यंत्रणेतील बिघाडाने पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे व्हेंटिलेटर चालत नसल्याची बाब डाॅक्टर, परिचारिकांच्या लक्षात आली. तेव्हा याठिकाणी सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. व्हेंटिलेटरमध्ये अशी काही अडचण आल्यास आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास लागल्यास अंबू बॅगचा वापर करावा लागतो. त्यामुळे नातेवाईक, डाॅक्टर, परिचारिका, ब्रदर यांनी तत्काळ या रुग्णांना अंबू बॅगने कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली. आमच्या रुग्णाला आम्ही आमच्या हाताने अंबू बॅगने कृत्रिम श्वास दिल्याचे एका नातेवाइकाने सांगितले.  एक फ्यूज गेला होता. परंतु व्हेंटिलेटरवरील ६ रुग्णांना अंबू बॅग लावण्यात आले होते. 

भंडारा दुर्घटनेनंतरही भंडारा येथील दुर्घटनेनंतरही घाटीतील जुनाट विद्युत यंत्रणेची अवस्था ‘जैसे थे’ आहे. ट्रॉमा केअर युनिटमधील घटनेनंतर सोमवारी सकाळी याठिकाणी विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस