शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’अभावी मराठवाड्यातील रुग्णांचे हाल; उपचारासाठी मोठ्या शहरात जाता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 13:46 IST

ST Strike: घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णसंख्येत घट

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचे आधारवड म्हणून घाटी रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयाची ओळख आहे. दररोज मोठ्या संख्येने येणारे बाहेरगावचे रुग्ण एसटी बससेवेअभावी येऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी, या दोन्ही ठिकाणी रोजच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.

घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज दोन ते तीन हजारांच्या घरात रुग्ण येतात. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागासह मराठवाडा आणि लगतच्या भागातून रुग्ण येतात. ओपीडीत आल्यानंतर आवश्यकतेनुुसार काही रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात येते. मात्र, सध्या ओपीडीतील रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. कर्करोगावर नियमितपणे उपचार घ्यावे लागतात. त्यासाठी ठरावीक दिवशी रुग्णालयात यावे लागते. परंतु सध्या शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णसंख्येवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. दिवाळीतील सुट्यांबरोबर एसटी बंद असल्याने ये-जा करण्यासाठी वाहतूक सुविधाच नसल्याने उपचार पुढे ढकलले जात आहेत.

ओपीडीत रोज ३ हजार रुग्णघाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारण तीन हजारांपर्यंत रुग्ण उपचारासाठी येत असतात. दिवाळीतील सुट्यांत नागरिक गावी जातात. त्यामुळे ही संख्या सध्या कमी असू शकते. त्याबरोबर वाहतूक सुविधेअभावीदेखील सध्या उपचारासाठी येण्याचे टाळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, उपअधिष्ठाता, घाटी

घाटीतील ओपीडीतील रुग्णसंख्यातारीख- रुग्ण८ नोव्हेंबर-१२००९ नोव्हेंबर-९५०१० नोव्हेंबर -८५०

टॅग्स :ST Strikeएसटी संपMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद