शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

हाकललेला रुग्ण उपचारासाठी पुन्हा घाटीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:30 IST

लहान मुलीने सलाईन बाटली हातात धरल्याच्या प्रकारानंतर बदनामीचे कारण पुढे करून रुग्णालयातून हाकलून दिलेल्या रुग्णास सोमवारी (दि. २८) उपचारासाठी पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लहान मुलीने सलाईन बाटली हातात धरल्याच्या प्रकारानंतर बदनामीचे कारण पुढे करून रुग्णालयातून हाकलून दिलेल्या रुग्णास सोमवारी (दि. २८) उपचारासाठी पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपूर्ण उपचार पूर्ण होईपर्यंत सदर रुग्णावर वरिष्ठ डॉक्टरांनी देखरेख ठेवावी, सर्व औषधी देण्यात यावी, अशी सूचना प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी दिली.घाटी रुग्णालयात स्टँडअभावी वडिलांसाठी मुलीला हातात सलाईन धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांकडून घाटी प्रशासनाला विचारणा करण्यात आली; परंतु याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणत रुग्णालयातून हाक लून देण्यात आले होते. अर्धवट उपचार झालेल्या या रुग्णाने २१ मे रोजी ‘लोकमत’ कार्यालय गाठून आपली कैफीयत मांडली. एकनाथ गवळे (रा. मौजे भडजी, ता. खुलताबाद) असे या रुग्णाचे नाव असून, त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे २२ मे रोजी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. गवळे हे ५ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. शस्त्रक्रियेनंतर शस्त्रक्रियागृहातून वॉर्डात नेताना हातात सलाईन धरण्याची वेळ त्यांच्या मुलीवर आली. आजारी वडिलांसाठी हातातच सलाईन धरून मुलीला उभे केल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने घाटीतील दयनीय अवस्था समोर आली. या प्रकाराविषयी माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाले. हा विषय थेट दिल्लीपर्यंतही गेला. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांनी घाटी प्रशासनाला जाब विचारला. या घटनेनंतर १८ मे रोजी डिस्चार्ज कार्ड न देता हाकलून दिल्याने उपचार अर्धवट राहिल्याचा आरोप एकनाथ गवळे यांनी केला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य